अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर, प्रोमो पाहून प्रेक्षकांची वाढली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 11:56 AM2024-10-07T11:56:34+5:302024-10-07T11:57:17+5:30

Ashok Saraf : 'अशोक मा.मा.' या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

Ashok Saraf will appear on the small screen, the audience's curiosity increased after seeing the promo | अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर, प्रोमो पाहून प्रेक्षकांची वाढली उत्सुकता

अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर, प्रोमो पाहून प्रेक्षकांची वाढली उत्सुकता

'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली. पण महाराष्ट्राचे आवडते अभिनेते, अभिनय सम्राट, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) घेऊन येत आहेत एक नवी मालिका 'अशोक मा.मा.'. अशोक मामांची ही नवीकोरी मालिका तुफान एंटरटेनिंग असणार यात काही शंका नाही. या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

'येतोय महाराष्ट्राचा महानायक' म्हणत 'कलर्स मराठी'ने काही दिवसांपूर्वी 'अशोक मा.मा.' या मालिकेची पहिली झलक समोर आणली होती. अशातच आता या मालिकेचा उत्सुकता वाढवणारा नवा प्रोमो समोर आला आहे. शिस्तीचं पालन करणारे, काटकसरीचा स्वभाव असणारे, स्वत:च्या निर्णयांवर ठाम असणारे 'अशोक मा.मा.' म्हणजेच अशोक माधव माजगावकर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. बत्तीस वेळा काम सोडून गेलेली मोलकरीण तेहतीसव्या वेळी पुन्हा कामावर येते. त्यावेळी काटकसरी स्वभाव असलेले अशोक मा.मा. मोलकरीण थोडं जास्त वापरत असलेल्या तेलावरून, साबणावरून तिच्यासोबत वाद घालतात. त्यांच्यातला हा वादाचा गमतीशीर प्रसंग प्रेक्षकांची मात्र उत्कंठा वाढवतोय. 


'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री नेहा शितोळे या मालिकेत अशोक मामांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. तिने वठवलेली मोलकरीण चांगलाच भाव खाऊन जातेय. 'अशोक मा.मा' या मालिकेच्या माध्यमातून एक आगळीवेगळी कथा घेऊन टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा सज्ज आहेत. शिस्तप्रिय असणारे 'अशोक मा.मा.' आपल्या मिश्कील अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार एवढं मात्र नक्की..  'अशोक मा.मा' या मालिकेचा नवा प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 
 

Web Title: Ashok Saraf will appear on the small screen, the audience's curiosity increased after seeing the promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.