“राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 01:52 PM2023-09-08T13:52:52+5:302023-09-08T13:54:42+5:30

Jawan : शाहरुखच्या ‘जवान’चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन पाहून बॉलिवूड अभिनेत्याने दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारची तुलना सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौलींशी केली आहे.

atlee kumar is blockbuster director than ss rajamouli said krk after jawan first day box office collection | “राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

“राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

googlenewsNext

बहुप्रतीक्षित असलेला किंग खानचा ‘जवान’ अखेर गुरुवारी(७ सप्टेंबर) चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याऱ्या हिंदी चित्रपटांच्या पंगतीत ‘जवान’ने पहिलं स्थान मिळवलं आहे. या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून सगळेच थक्क झाले आहेत. ‘जवान’ने ‘बाहुबली’, ‘पठाण’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड पहिल्याच दिवशी मोडले आहेत.

शाहरुखच्या ‘जवान’चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन पाहून बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमल आर खान(केआरके)ने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने ‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारची तुलना सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौलींशी केली आहे. “जवानचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन ८०कोटींपेक्षा जास्त...अ‍ॅटली कुमारने हे सिद्ध केलं की तो राजामौलींपेक्षा ब्लॉकबस्टर दिग्दर्शक आहे,” असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?

अ‍ॅटली कुमार हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेला दिग्दर्शक आहे. अनेक सुपरहिट सिनेमे त्याने सिनेसृष्टीला दिले आहेत. ‘थेरी’, ‘राजा रानी’, ‘बिगील’ यांसारख्या सिनेमासाठी तो ओळखला जातो. अ‍ॅटलीने २०१४ साली अभिनेत्री कृष्णा प्रियाबरोबर लग्नगाठ बांधली. काही महिन्यांपूर्वीच ते आईबाबा झाले आहेत. त्यांना ‘मीर’ हा मुलगा आहे.

अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

दरम्यान, ‘जवान’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला. ‘जवान’ने हिंदी व्हर्जनमध्ये ६५ कोटींची कमाई केली आहे. तर सर्व भाषांमध्ये एकूण ७५ कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधूनच या चित्रपटाने कोटींची कमाई केली होती. ‘जवान’मध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथीबरोबर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही झळकली आहे.

Web Title: atlee kumar is blockbuster director than ss rajamouli said krk after jawan first day box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.