अॅटिट्युड इज इम्पॉर्टन्ट
By Admin | Published: March 7, 2016 02:33 AM2016-03-07T02:33:31+5:302016-03-07T02:33:31+5:30
तू तिथे मी या मालिकेतून घराघरांत पोहोचणारी प्रिया म्हणजेच प्रिया मराठे ‘लोकमत सीएनएक्स’शी संवाद साधताना म्हणाली की, ‘मी रिल लाइफमध्ये किती ही निगेटिव्ह भूमिका करीत असले
तू तिथे मी या मालिकेतून घराघरांत पोहोचणारी प्रिया म्हणजेच प्रिया मराठे ‘लोकमत सीएनएक्स’शी संवाद साधताना म्हणाली की, ‘मी रिल लाइफमध्ये किती ही निगेटिव्ह भूमिका करीत असले, तरी रिअल लाइफमध्ये खूप शांत आहे. मी कोणाशी जास्त काही बोलत नाही, तसेच लाइफमध्ये कोणाला वाईट वाटू नये, यासाठी अॅडजस्टिंग करणे हा माझा स्वभाव आहे. नेमके याच स्वभावाचा लोक गैरफायदा उचलतात. त्यामुळे खास अशा लोकांसाठी सोशल मीडिया हा एक उत्तम पर्याय असतो. या ठिकाणी अशा लोकांंना उद्देशून लिहिता येते. म्हणजेच ज्याला कळायचं त्याला कळतं. म्हणून अशा लोकांसाठी अॅटिट्युड इज इम्पॉर्टन्ट आणि तो त्यांना त्या ठिकाणी दाखविलाच पाहिजे.’