"चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते... " अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:09 AM2024-10-15T11:09:35+5:302024-10-15T11:11:32+5:30

प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे.

atul parchure passed away marathi actor kiran mane share old memory | "चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते... " अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली हळहळ

"चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते... " अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली हळहळ

Atul Parchure : प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे. मराठी सिनेमा, मालिका तसेच रंगभूमी गाजवणाऱ्या या चतुरस्त्र अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. काही वर्षांपूर्वीचं त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावर मात करत त्यांनी नवीन इनिंगला सरुवात केली होती. अतुल यांच्या अकाली निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


मराठी सिनेसृष्टीतील एक दिलखुलास व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. अतुल परचुरेंची मराठी सिनेसृष्टील अनेक कलाकारांसोबत घट्ट मैत्री होती. त्याच्या निधनामुळे  सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच राजकीय क्षेत्रातून तसेच मनोरंजन विश्वातील मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेते किरण माने (kiran mane)  यांनी देखील अतुल परचुरेंच्या निधनाबाबत कळताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहलंय, "माझी आणि अतुल परचुरेची खुप मैत्री वगैरे नव्हती. एकमेकांची नाटके बघणे आणि प्रयोगानंतर थोडी चर्चा करणे या व्यतिरिक्त फार संबंध आला नाही".

पुढे ते म्हणाले, "पण, दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आमचं एकमेकांशी दोन-तीन वेळा फोनवर बोलणं झालं. जे बोलणं झालं ते खूप महत्त्वाचं होतं. गंभीर विषयांवर होतं. प्रस्थापितांशी बोलताना मी थोडा सावध असतो. माझ्याविषयी कुणाचा कुणी काय गैरसमज करून दिलेला आहे, ते माहिती नसतं. पण अतुल पहिल्या फोनमध्येच अगदी जुनी मैत्री असल्यासारखं भरभरुन बोलला. बोलण्यात आपुलकी होती. ज्या विषयांसाठी फोन झाला, त्यासंदर्भात हातचे न राखता माहिती दिली. ज्या माहितीचा मला प्रचंड उपयोग झाला. 'माणूस' म्हणून हा लाखात एक आहे हे जाणवले. चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते, खचल्यासारखं होतं. अलविदा अतुल!"

Web Title: atul parchure passed away marathi actor kiran mane share old memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.