‘टेक केअर गुड नाइट’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 01:22 PM2018-08-31T13:22:56+5:302018-08-31T13:26:47+5:30

प्रेक्षकांनी सायबर गुन्हेगारीवर बेतलेल्या व मराठीत पहिल्यांदाच हाताळलेल्या या कथेला अक्षरशः डोक्यावर घेतले असून, चित्रपट आजच्या टेकसॅव्ही पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो, अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

The audience's spontaneous response to 'Take Care Good Night' | ‘टेक केअर गुड नाइट’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘टेक केअर गुड नाइट’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्दे“टेक केअर गुड नाईट’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे त्याचप्रमाणे तो रहस्यपटही आहे.महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका

महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, इरावती हर्षे यांच्यासारखे दिग्गज कालकार, दमदार कथा आणि मराठीत अभावानेच हाताळला जाणारा रहस्यपटाचा प्रकार अशा थाटात ‘टेक केअर गुड नाईट’ ३१ ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्याला संपूर्ण महाराष्ट्रभर भरघोष प्रतिसाद लाभतो आहे. प्रेक्षकांनी सायबर गुन्हेगारीवर बेतलेल्या व मराठीत पहिल्यांदाच हाताळलेल्या या कथेला अक्षरशः डोक्यावर घेतले असून, चित्रपट आजच्या टेकसॅव्ही पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो, अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे या युवा व गुणवान कलाकारांच्या भूमिका आणि लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आज निम्नशिक्षित लोकांपेक्षा उच्चशिक्षित लोकच सायबर गुन्ह्यांना अधिक बळी पडतात, हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या गुन्ह्यांमुळे आर्थिक फटका बसतो आणि  कुटुंबाची घडीही बिघडते. तंत्रज्ञानाधारीत जीवनशैलीमुळे मध्यमवर्गीय शहरी कुटुंबातील २५ मधील एकजण या गुन्हेगारीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बळी पडतो. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बिकट होत असताना त्यावर प्रभावी आणि अचूक असे भाष्य करणारा आणि उपायही सुचवणारा ‘टेक केअर गुड नाईट’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

“टेक केअर गुड नाईट’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे त्याचप्रमाणे तो रहस्यपटही आहे. मराठीत अशाप्रकारचे थ्रीलर खूप कमी बनतात. हा चित्रपट म्हणजे तुमच्या आमच्या घरात घडणारी कथा आहे, पण ती तुमची झोप उडवू शकते, एवढ्या गंभीर घटनेवर ती आधारित आहे. यातील कलाकारही तेवढ्याच ताकदीचे आहेत. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, मी, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे पर्ण पेठे या कलाकारांबरोबर गिरीश जयंत जोशी या कसलेल्या लेखकाचे पहिलेच पण प्रभावी दिग्दर्शन  म्हणून हे चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाल्यावर त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही ‘टेक केअर गुड नाईट’ आवर्जून पाहायला हवा,” सचिन खेडेकर म्हणाला.  

चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची आहे. या चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील ( एस पी एंटरटेन्मेंट ) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे संगीत चित्रपटाला आहे.  

“सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. ही आजच्या काळाची, आजचे प्रॉब्लेम मांडणारी कथा आहे. सायबर क्राईम कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही यातून अनुभवू शकता. तंत्रज्ञानाचा वापर करताना काय करावे आणि काय करू नये, याचे नेमके भाष्य यात आहेत,” लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी म्हणाले. 

“मी यात साकारलेली भूमिका ही फारच आव्हानात्मक आणि मी आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल एक वेगळाच दृष्टीकोन हा चित्रपट आपल्याला देवून जातो.चित्रपटाची पटकथा मी ऐकली आणि त्यातल्या इन्स्पेक्टर पवारच्या प्रेमात पडलो. आपल्याकडे बर्‍याचदा पोलिस ‘सुपर-हयूमन’ किंवा पूर्णपणे भ्रष्ट दाखवले जातात. यातील इन्स्पेक्टर पवार हा खूप खरा वाटणारा, वेगळ्या शेड्स असलेला आहे. त्यामुळे पटकथा ऐकल्यावर मी लगेचच ही भूमिका करायची ठरवले,” असे महेश मांजरेकर म्हणतात.

Web Title: The audience's spontaneous response to 'Take Care Good Night'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.