­और है काैन...? नव्वदीची इमेज, साठीतही ‘क्रेझ’

By संदीप आडनाईक | Published: September 24, 2023 10:24 AM2023-09-24T10:24:29+5:302023-09-24T10:30:49+5:30

प्रेक्षकांनी पुन्हा चित्रपटगृहांसमोर रांगा लावल्या आहेत. केवळ मल्टिप्लेक्सच नव्हे तर सिंगल थिएटर्समध्येही गर्दी होत आहे

Aur Hai Kain...? 90's image, also 'craze' for | ­और है काैन...? नव्वदीची इमेज, साठीतही ‘क्रेझ’

­और है काैन...? नव्वदीची इमेज, साठीतही ‘क्रेझ’

googlenewsNext

संदीप आडनाईक
उप मुख्य उपसंपादक, कोल्हापूर 

नव्वदच्या दशकातील नायक पुन्हा हिट होत आहेत. सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण या सर्वांपाठोपाठ सनी देओलसारख्या ‘साठी’ ओलांडलेल्या कलाकारांचे चित्रपट यशाचे शिखर गाठत आहेत. गेल्या दोन महिन्यांत करण जोहरचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’, रजनीकांतचा ‘जेलर’, अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड- २’ हे  चित्रपट यशस्वी ठरले. त्यांनी चांगली कमाई केली आहे. आता ‘गदर-२’ आणि ‘जवान’ या चित्रपटांच्या यशामुळे बॉलिवूडमध्ये यशाचे नवीन समीकरण मांडले गेले आहे. सर्वच सिनेमांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटांतील अभिनेत्यांचे वय.
इंडस्ट्रीत अमिताभ बच्चन (८०), रजनीकांत (७२), सनी देओल (६५), संजय दत्त (६४), आमीर खान (५८), शाहरुख खान (५७), सलमान खान (५७), अक्षय कुमार (५६) आणि अजय देवगण (५४) यांची अजूनही क्रेझ आहे, त्यांच्या सर्वच चित्रपटांनी ३०० कोटींचा व्यवसाय केल्याने सिद्ध झाले आहे.

प्रेक्षकांनी पुन्हा चित्रपटगृहांसमोर रांगा लावल्या आहेत. केवळ मल्टिप्लेक्सच नव्हे तर सिंगल थिएटर्समध्येही गर्दी होत आहे. या बदलामुळे चित्रपटसृष्टीत नवी ऊर्जा भरली आहे. हा भारतीय चित्रपटांचा जुना फॉर्म्युला आहे. दक्षिणेकडचे सिनेमे गाजले की, त्यांचे रिमेक बनतात आणि आता १९९० च्या दशकातील नायकही हिट होऊ लागले आहेत. त्यांच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, २०१३ मध्ये दिग्दर्शनाच्या कारकिर्दीची सुरुवात करणारा ॲटलीकुमारसारखा तरुण नव्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून जुन्या अभिनेत्यांना प्रमुख भूमिकेत ठेवून चित्रपट काढतो आणि तो हिट होतोय. दक्षिणेकडील चित्रपटांचे रिमेक आणि ओटीटी यांचा प्रेक्षकही या चित्रपटांनी खेचून घेतला असे म्हणता येईल. पण ‘जवान’, ‘गदर-२’ आणि ‘ओ माय गॉड- २’ या चित्रपटांमुळे इंडस्ट्रीत एक नवा उत्साह संचारला आहे, हे नक्की.

चित्रपट निर्मितीत पुन्हा स्क्रिप्ट आणि सशक्त कथेसाठी काम होत आहेत. ‘गदर-२’साठी लोक अजूनही सिनेमागृहात जात आहेत. सर्वांत वेगवान ३०० कोटी कमावणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. ओटीटी आल्याने थिएटर संपणार हे भाकीत चुकीचे ठरत ‘गदर-२’नंतर आयुष्मान याचा ‘ड्रीम गर्ल-२’ आणि त्यानंतर शाहरुख खानचा ‘जवान’ या चित्रपटांनी मिळविलेले यश हे याचे द्योतक आहे.  

Web Title: Aur Hai Kain...? 90's image, also 'craze' for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.