Australia Fire: ऑस्ट्रेलियाच्या जंगलासाठी एकवटले बॉलिवूड; भूमी, कुणाल, मलायका व दियाने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:56 PM2020-01-06T18:56:27+5:302020-01-06T18:57:15+5:30
ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली.
ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली. वन्यप्राण्यांनाही आपले जीव गमवावे लागले. या आगीने आतापर्यंत २३ जणांचा बळी घेतला आहे. शिवाय जवळपास ५० कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक बॉलिवूड स्टार्सने सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, वातावरणातील बदल हा जागतिक आणीबाणी आहे. आपण नामशेष होण्याच्या मार्गावर आहोत. ऑस्ट्रेलिया अद्याप जळत आहे. जवळपास पाचशे मिलियन प्राण्यांना आपला प्राण गमावला आहे. त्यांना त्वरीत पैसे व पाठिंब्याची गरज आहे. त्यांना पाठिंबा द्या.
टायगर श्रॉफने या अग्नितांडवावर दुःख व्यक्त करत त्याने लिहिले की, आपण या लोकांसाठी काय करणार आहोत.
तर दिशा पटानीने लिहिले की, हे काय होत आहे. इतकं सगळं घडल्यानंतरही आपण प्राण्यांना वाचवू शकलो नाही आणि प्राण्यांनादेखील नाही. पर्यावरणाचे प्रदुषण होत आहे. जवळपास ५०० प्राण्यांचा बळी गेला आहे. कशाची वाट पाहत आहात?
कुणाल खेमूने लिहिले की, ऑस्ट्रेलियामध्ये बुशफायर्सची आग देशाला सप्टेंबरपासून जळत आहे. ऑस्ट्रेलियातील वायूचा दर्जा खूप खराब होत आहे.
मलायका अरोराने लिहिले की, आम्ही ऑस्ट्रेलियासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांनी जो फोटो शेअर केला आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचा मॅप सहज पाहू शकतो.
याशिवाय दीया मिर्झाने म्हटलं की, हे खरं आहे. हे होत आहे. हे इथेच थांबले पाहिजे. आपण हे थांबवू शकतो. आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आणि वातावरणावर मिळून काम केलं पाहिजे.