अवधूत म्हणतोय आता पाठ करा

By Admin | Published: March 18, 2016 12:28 AM2016-03-18T00:28:11+5:302016-03-18T00:28:11+5:30

चित्रपटातील एखादे गाणे गाजले की, तो चित्रपट सुपरहिट झाला म्हणूनच समजा. असे किती तरी चित्रपट आहेत जे फक्त गाण्यांमुळे हिट झाले आहेत.

Avadhuta says so now | अवधूत म्हणतोय आता पाठ करा

अवधूत म्हणतोय आता पाठ करा

googlenewsNext

चित्रपटातील एखादे गाणे गाजले की, तो चित्रपट सुपरहिट झाला म्हणूनच समजा. असे किती तरी चित्रपट आहेत जे फक्त गाण्यांमुळे हिट झाले आहेत. बॉलीवूडप्रमाणे आता मराठीतही अनेक धडाकेबाज अन् भन्नाट शब्द असलेली गाणी आली आहेत. अशा प्रकारच्या गाण्यांना आजची तरुणाई डोक्यावर घेताना दिसते. बरेचदा गाण्यांचे शब्द काय आहेत हे समजतच नसते, तरीदेखील ते गाणे आपल्याला आवडते. म्हणूनच आता अवधूत गुप्ते म्हणतोय, पाठ करा. अवधूत शाहरूखच्या चित्रपटातील जबरा फॅन गाणे गात आहे आणि हे गाणे आता त्याच्या शब्दांसहित यू-ट्यूबवर अव्हेलेबल झाले आहे. ज्या प्रेक्षकांना या गाण्याचे शब्द समजले नव्हते, त्यांच्यासाठी खास मराठी सबटायटल्समधील व्हिडीओ आला आहे. आता शाहरूखच्या जबरा फॅन्सना या लिरिक्समुळे आनंद तर झालाच असणार ना.

Web Title: Avadhuta says so now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.