Avatar 2 Box Office Day 1: 'अवतार 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली छप्परफाड कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 07:19 PM2022-12-16T19:19:41+5:302022-12-16T19:29:04+5:30

या चित्रपटाचे 17000 हून अधिक शो देशभरातील 3800 हून अधिक स्क्रीनवर दाखवले जात आहेत. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम'चा विक्रमही मोडणार आहे असं दिसतंय.

Avatar the way of water day 1 box office prediction and advance booking | Avatar 2 Box Office Day 1: 'अवतार 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली छप्परफाड कमाई

Avatar 2 Box Office Day 1: 'अवतार 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली छप्परफाड कमाई

googlenewsNext

James Cameron Avatar Sequals: प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'अवतार'चा सीक्वल 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way of Water) आज 16 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. चाहते या चित्रपटाची अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. अखेर 13 वर्षानंतर दिग्दर्शक जेम्स कॅमरुन (James Cameron) यांनी चित्रपटाचा दुसरा पार्ट आणला आहे. भारतात या चित्रपटाबाबत जबरदस्त क्रेझ आहे. शनिवार आणि रविवारसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. जवळपास २१०० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये बनलेला 'अवतार: द वे ऑफ वॉटर'नं भारतात केवळ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून पहिल्या तीन दिवसांत ४०-४५ कोटी रुपयांची कमाई करेल, असे दिसते.हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम'चा विक्रमही मोडणार आहे असं दिसतंय. 

'अवतार 2' भारतात हिंदी आणि इंग्रजी तसेच तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे. दररोज या चित्रपटाचे 17000 हून अधिक शो देशभरातील 3800 हून अधिक स्क्रीनवर दाखवले जात आहेत. गुरुवारपर्यंत या चित्रपटाची ४ लाखांहून अधिक तिकिटं अ‍ॅडव्हान्स बुक झाली आहेत, यावरूनही भारतीय प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची क्रेझ लक्षात येते. तिकीट विक्री अजूनही सुरू आहे.


भारतात, 'अवतार: द वे ऑफ वॉटर' पहिल्या दिवशी बंपर कमाई करेल. ज्या पद्धतीने अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले आहे, त्यावरून हा चित्रपट देशातील सर्व भाषांमध्ये 30-35 कोटी रुपयांची सहज कमाई करेल असा अंदाज आहे. अमेरिकन मीडियानुसार, 'अवतार 2' जगभरात ओपनिंगच्या दिवशी 17 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 140 कोटींची कमाई करू शकतो.


 

Web Title: Avatar the way of water day 1 box office prediction and advance booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.