Avengers- Endgame: ए. आर. रहेमानच्या ‘मार्वेल अँथम’ने केली चाहत्यांची निराशा! म्हटले ‘एप्रिल फुल’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:01 PM2019-04-02T14:01:49+5:302019-04-02T14:02:14+5:30
मार्वेल स्टुडिओचा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूड सिनेमा याच महिन्यात २६ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केली. आता या चित्रपटाचे ‘अँथम साँग’ रिलीज झालेय.
मार्वेल स्टुडिओचा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूड सिनेमा याच महिन्यात २६ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केली. आता या चित्रपटाचे ‘अँथम साँग’ रिलीज झालेय. भारतीय प्रेक्षकांना खास भेट म्हणून मार्वेल स्टुडिओने ‘अॅव्हेंजर्स- द एंडगेम’चे भारतीय अँथम रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. हे अँथम साँग बनवण्याची जबाबदारी सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक ए आर रहेमान यांच्यावर सोपवण्यात आली होती. साहजिकच भारताचा दिग्गज संगीतकार ए. आर. रहेमान याने बनवलेल्या या ‘अँथम साँग’कडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. पण हे काय? ‘अँथम साँग’ रिलीज झाले आणि चाहत्यांची निराशा झाली.
Here's something special for all you amazing Marvel India fans! Presenting the #MarvelAnthem created by the maestro @arrahman.@Russo_Brothershttps://t.co/cu6Z5I4LyE
— Marvel India (@Marvel_India) April 1, 2019
मार्वेलची सगळी पात्र या ‘मार्वेल अँथम’मध्ये आहेत. पण मिसिंग आहे ती केवळ ए. आर. रहेमानची ‘जादू’. होय, ‘मार्वेल अँथम’ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तरीच अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘रोके ना रूकेंगे अब तो यारा...’ असे या ‘मार्वेल अँथम’चे बोल आहेत. काल १ एप्रिलला मार्वेल स्टुडिओने हे अँथम सॉन्ग प्रदर्शित केले. पण ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना याला ‘एप्रिल फुल’ म्हटले.
Worst antham for endgame #MarvelAnthem
— Ritik Pandey (@itsmeRitik_) April 1, 2019
#MarvelAnthem
It isn't the level of MCU.— CHOWKIDAR THANOS (@TitanKaThanos) April 1, 2019
The #MarvelAnthem by AR Rahman is terribly disappointing. It’s a fine standalone song, but doesn’t suit the evocative & powerful nature of #Endgame’s marketing campaign.
Rahman of the now was not the right guy to compose the song. Shankar Ehsaan Loy would’ve been a better fit.— Dashran Yohan (@dashtalksmovies) April 1, 2019
‘अॅव्हेंजर्स एंडगेम’अॅव्हेंजर्स सीरिजचा अखेरचा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवणाऱ्या मार्वेल स्टुडिओने सध्या जगभर प्रमोशनचा धडाका चालवला आहे. भारतातही याचे जबरदस्त प्रमोशन सुरु आहे. ‘अॅव्हेंजर्स- द एंडगेम’ हिंदीसह तामिळ आणि तेलगू अशा दाक्षिणात्य भाषांतही प्रदर्शित होतोय. ‘गजनी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ए आर मुरूगदास ‘अॅव्हेंजर्स- द एंडगेम’च्या साऊथ व्हर्जनचे संवाद लिहित आहेत.