Avengers Infinity War: चौथ्या दिवशी पद्मावतला मात, आत्तापर्यंत केली इतकी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 02:14 PM2018-05-01T14:14:11+5:302018-05-01T14:17:02+5:30
'अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ भारतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये भर पडत आहे.
मुंबई : 'अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ भारतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये भर पडत आहे. चौथ्या दिवशी या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केलाय. त्यानुसार चौथ्या दिवशी या सिनेमाती ग्रॉस कमाई 147 कोटी रुपये इतकी झाली आहे. इतकेच नाहीतर या सिनेमाने पद्मावत सिनेमाचा रेकॉर्ड तोडला आहे.
सोमवारी या सिनेमा 20.52 कोटी रुपयांची कमाई केली. अशात या सिनेमाच्या कमाईता आकडा एकूण 114 कोटी रुपये इतका झालाय. पद्मावत या सिनेमाने 4 दिवसात 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता आज (मंगळवार) कामगार दिवसाची सुट्टी असल्याने हा सिनेमा 170 ते 175 कोटी रुपयांची कमाई करणार असा अंदाज आहे.
#AvengersInfinityWar continues its DREAM RUN... Mon biz is a SHOCKER... That too on 2000+ screens... Fri 31.30 cr, Sat 30.50 cr, Sun 32.50 cr, Mon 20.52 cr. Total: ₹ 114.82 cr NettBOC. India biz... GrossBOC: ₹ 147.21 cr... #Avengers#InfinityWar
— taran adarsh (@taran_adarsh) May 1, 2018
#AvengersInfinityWar is a GAME-CHANGER... Like #Baahubali2 was in 2017... Will easily surpass *lifetime biz* of #TheJungleBook and emerge the HIGHEST GROSSING *Hollywood film* in India... #Avengers#InfinityWar
— taran adarsh (@taran_adarsh) May 1, 2018
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांच्यानुसार, हा सिनेमा बाहुबली 2 सारखा गेमचेंजर होऊ शकतो. हा सिनेमा जंगल बुक या सिनेमाचा रेकॉर्ड तोडून भारतात सर्वात जास्त कमाई करणारा हॉलिवूड सिनेमा ठरु शकतो. याआधीच 30 कोटींची कमाई करत या सिनेमाने या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंगचा मान मिळवला आहे.
2018 मध्ये आलेल्या सिनेमांची ओपनिंग डे कमाई
'अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' - 3- कोटी रुपये
बागी 2 - 25 कोटी रुपये
पद्मावत - 24 कोटी रुपये
पॅडमॅन - 10.26 कोटी रुपये
रेड - 10.04 कोटी रुपये