‘चॉक अ‍ॅण्ड डस्टर’ला सरासरी यश

By Admin | Published: January 19, 2016 02:29 AM2016-01-19T02:29:33+5:302016-01-19T02:29:33+5:30

शबाना आझमी आणि जूही चावला यांसारखे कलावंत असूनही ‘चॉक अ‍ॅण्ड डस्टर’ या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर फारसे यश मिळवता आले नाही.

Average achievement to 'Chuck and Duster' | ‘चॉक अ‍ॅण्ड डस्टर’ला सरासरी यश

‘चॉक अ‍ॅण्ड डस्टर’ला सरासरी यश

googlenewsNext

शबाना आझमी आणि जूही चावला यांसारखे कलावंत असूनही ‘चॉक अ‍ॅण्ड डस्टर’ या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर फारसे यश मिळवता आले नाही. खासगी शाळांचे व्यवस्थापन आणि शिक्षकांत चालणाऱ्या संघर्षावर आधारित या चित्रपटाकडून मोठ्या यशाची अपेक्षाच नव्हती. घडलेही तसेच. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत एक कोटीहून कमी कमाई केली. याला सरासरीहून अधिक यश म्हणता येऊ शकत नाही. चॉकला मल्टिप्लेक्समध्ये चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा होती. मात्र, तसे झाले नाही.
यापूर्वी प्रदर्शित चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास २०१६ चा पहिला मोठा चित्रपट वजीरने पहिल्या आठवड्यातच २१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. मात्र, सोमवारनंतर रसिकांच्या प्रतिसादात घसरण झाली. विधू विनोद चोप्रा प्रॉडक्शनच्या या चित्रपटाने गेल्या दहा दिवसांत ३३ कोटी रुपये कमावले. संजय लीला भन्साली यांचा बाजीराव मस्तानी आणि शाहरूख खानचा दिलवाले हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर स्थिरावले आहेत. बाजीराव आजही दिलवालेच्या किती तरी पुढे आहे. या सप्ताहापर्यंत दिलवालेने १४२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला, तर बाजीरावने १८४ कोटी रुपये कमावले. धिम्या गतीने का होईना बाजीराव मस्तानी २०० कोटी रुपयांचा आकडा गाठू शकेल; तथापि, दिलवाले १५० कोटींचा आकडा गाठेल याबाबत शंका आहे. येत्या शुक्रवारी एअरलिफ्ट हा नववर्षातील दुसरा मोठा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ९० च्या दशकात अरब देशांतील संघर्षादरम्यान तेथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यावर आधारित या चित्रपटाचा अक्षय कुमारने जोरदार प्रचार केला आहे. अक्षयच्याच प्रॉडक्शन हाऊसने भागीदारीत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निम्रत कौर (लंच बॉक्स फेम) या चित्रपटात अक्षयची सह कलाकार आहे. याशिवाय एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शन हाऊसने तयार केलेला क्या कूल हैं हमचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. तुषार कपूर, आफताब शिवदासानी जोडीच्या या चित्रपटात हॉट दृश्ये आणि दुहेरी अर्थाच्या संवादांचा भरणा आहे. हा चित्रपट मसाला चित्रपट आवडणाऱ्यांच्या पसंतीस उतरण्याची अपेक्षा आहे. या दोन चित्रपटांशिवाय जुगानी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवे चेहरे आहेत.

Web Title: Average achievement to 'Chuck and Duster'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.