बॉडीगार्डनेच केला चुकीचा स्पर्श अन्..., 'बालिका वधू' फेम अविका गौरचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:24 AM2024-09-09T11:24:04+5:302024-09-09T11:24:59+5:30

कझाकिस्तानमध्ये काय घडलं? अविका म्हणाली...

Avika Gor revealed her bodyguard touched her inappropriately in kazakhstan | बॉडीगार्डनेच केला चुकीचा स्पर्श अन्..., 'बालिका वधू' फेम अविका गौरचा धक्कादायक खुलासा

बॉडीगार्डनेच केला चुकीचा स्पर्श अन्..., 'बालिका वधू' फेम अविका गौरचा धक्कादायक खुलासा

'बालिका वधू' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) सध्या काही सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. अविकाने आपल्या फिटनेसमध्येही बराच बदल केला आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. नुकतंच अविकाने तिला आलेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितलं. बॉडीगार्डनेच तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. 

अविका गौरला आजही चाहते आनंदी या नावानेच ओळखतात. या मालिकेमुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली. आता अविका मोठी झाली असून सिनेमांमध्ये लीड रोलमध्ये दिसत आहे. नुकतंच हॉटरफ्लाय चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अविकाने कझाकिस्तानमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेविषयी सांगितलं. ती म्हणाली, "भारतात तर अनेकदा गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. पण माझ्यासोबत कझाकिस्तानमध्येही बरेचदा असं घडलं. बॉडीगार्ड हे नेहमीच आपल्यासोबत असतात. त्यातला एखादा असा असतो जो जास्तच स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करतो."


ती पुढे म्हणाली, "कझाकिस्तानमधील एका कार्यक्रमात मी स्टेजवर जात असताना एका बॉडीगार्डने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्याशिवाय बाजूला कोणीच नव्हतं. तो वारंवार तसंच करत होता. परत तो स्पर्श करणार तेवढ्यात मी त्याला पकडलं. त्याच्याकडे रागाने पाहत मी त्याला 'काय?' असं म्हणाले. त्यावर त्याने सॉरी सॉरी म्हणत माफी मागितली."

अविका गौर नुकतीच 'ब्लडी इश्क' सिनेमात दिसली. तसंच गेल्यावर्षी तिचा 1920 हा हॉरर सिनेमाही रिलीज झाला. याशिवाय ती काही साऊथ सिनेमांमध्येही झळकली.

Web Title: Avika Gor revealed her bodyguard touched her inappropriately in kazakhstan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.