रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 01:08 PM2024-07-14T13:08:22+5:302024-07-14T13:09:54+5:30

'म्हातारचाळे बंद करा' असं म्हणत त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. आता नुकतंच अविनाश नारकर यांनी या ट्रोलिंगवर थेट उत्तर दिलं आहे.

Avinash Narkar befitting reply to trollers says we will do what we want to do | रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...'

रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...'

सोशल मीडियावरअविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या कपलच्या रील्सची जोरदार चर्चा असते. नेटकऱ्यांना यांचे काही रील आवडतात तर काही नेटकरी त्यांना जोरदार ट्रोल करतात. 'म्हातारचाळे बंद करा' असं म्हणत त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. आता नुकतंच अविनाश नारकर यांनी या ट्रोलिंगवर थेट उत्तर दिलं आहे.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अविनाश नारकर म्हणाले, "बदल ही काळाची गरज आहे या गोष्टीशी आम्ही १०० टक्के सहमत आहोत. काळानुसार बदललं तरच तुम्ही प्रवाहाबरोबर राहता. हे अगदी जगजाहीर आहे की ऐश्वर्या माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. हे आमच्या दोघांच्या पथ्यावर पडलेलं आहे. दोघांमध्ये अंतर असल्याने एक माणूस एका टप्प्यावर पोहोचलेला असतो आणि तो मागच्या माणसासोबत ते अनुभव शेअर करु शकतो. असं म्हणत आपण सोबत चालतो. जेव्हा हे डिजिटल युग सुरु झालं तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवलं होतं की सिनेमे केले, मालिका केल्या आता आपण आपली कामाची पद्धत बदलली पाहिजे. मी मुळात लालबाग परळचा आहे. त्यामुळे माझ्या अंगात किडे हे होतंच. पण आमच्या क्षेत्रात स्वत:ची प्रतिमा सांभाळून सगळं करावं लागतं. त्यामुळे मला कोणत्याही बाराखडीतल्या शिव्या ज्ञात आहेत. पण मी काम करताना माझी तशी प्रतिमा असणं चूकीचं आहे."

ते पुढे म्हणाले, "लोक म्हणतात थिल्लरपणा करता. पण आपली नाच करायची पद्धतच ती आहे. आपण असेच दिलखुलास हावभाव करत नाच करतो. त्यामुळे आम्ही ते ठरवलंय आणि ते करणार. हे रील्स वगरे आम्ही शूटनंतर घरी आलो की रात्री  ११ नंतर दीड तास करतो. त्या वेळात आम्ही खूप मजा करतो. स्वत:ला एनर्जेटिक जाणवतं."

Web Title: Avinash Narkar befitting reply to trollers says we will do what we want to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.