आयुष्यमान खुराणाच्या मुलांना नाही त्यांच्या डॅडचे चित्रपट पाहण्याची परवानगी; हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 11:23 AM2019-05-02T11:23:33+5:302019-05-02T11:24:15+5:30
आजघडीला आयुष्यमानचे लाखो चाहते आहेत. पण आयुष्यमानच्या स्वत:च्या मुलांना मात्र त्याचे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही.
ठळक मुद्देआयुष्यमान सध्या ‘ड्रिम गर्ल’ आणि ‘आर्टिकल 15’ या दोन चित्रपटांत बिझी आहे.
आयुष्यमान खुराणा याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या आयुष्यमानने गेल्या सात वर्षांत खूप मोठा पल्ला गाठला. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ या त्याच्या चित्रपटांनी बक्कळ कमाई केली आणि आयुष्यमान ‘ए लिस्ट’ कलाकारांच्या यादीत जाऊन बसला. आजघडीला आयुष्यमानचे लाखो चाहते आहेत. पण आयुष्यमानच्या स्वत:च्या मुलांना मात्र त्याचे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही. होय, खुद्द आयुष्यमानने एका ताज्या मुलाखतीत हा खुलासा केला.
माझ्या मुलांना माझे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही. ते वरूण धवन, रणवीर सिंग किंवा इतर कुणाचेही चित्रपट पाहू शकतात. पण माझे चित्रपट पाहण्यास आम्ही त्यांना मनाई केली आहे. याचे कारण म्हणजे, प्रत्येक चित्रपटात किसींग सीन असतात. मुलांनी आपल्या पित्याला दुसºया कुण्या महिलेसोबत किसींग सीन देताना पाहणे, माझ्या मते योग्य नाही. त्यांनी माझ्याशी एका स्टारप्रमाणे वागावे, हेही मला मान्य नाही. त्यामुळेही मी त्यांना माझे चित्रपट पाहण्यास मनाई केली आहे. माझ्या मुलांना मी एक सामान्य आयुष्य देऊ इच्छितो. मी स्टार आहे, हे आताश: मुलांनाही कळून चुकले आहे. कारण पापाराझी कायम माझ्या मागावर असतात. सुरुवातीला माझ्या मुलांना हे सगळे खूप विचित्र वाटायचे. पण आता त्यांना याची सवय झाली आहे, असे आयुष्यमान या मुलाखतीत म्हणाला.
आयुष्यमान सध्या ‘ड्रिम गर्ल’ आणि ‘आर्टिकल 15’ या दोन चित्रपटांत बिझी आहे. ‘ड्रिम गर्ल’ एक रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा आहे तर ‘आर्टिकल 15’ एक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा फिल्म आहे.