karwa chauth 2018 : आयुषमान खुराणाने करवा चौथच्या दिवशी पत्नी ताहिरा कश्यपला दिली ही खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:56 PM2018-10-27T16:56:44+5:302018-10-27T17:04:18+5:30

आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यप ही गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याने या वर्षी ती करवा चौथ करू शकत नाही. त्यामुळे आयुषमानने तिला करवा चौथच्या निमित्ताने एक खास भेट दिली आहे.

Ayushmann Khurrana is fasting on Karwa Chauth for wife Tahira’s long life after her cancer scare | karwa chauth 2018 : आयुषमान खुराणाने करवा चौथच्या दिवशी पत्नी ताहिरा कश्यपला दिली ही खास भेट

karwa chauth 2018 : आयुषमान खुराणाने करवा चौथच्या दिवशी पत्नी ताहिरा कश्यपला दिली ही खास भेट

Next

आज करवा चौथ असून अनेक पत्नींनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास केलेला आहे. आजकाल अनेक पती देखील आपल्या पत्नीसोबत उपवास करताना दिसतात. पण एखाद्या पतीने आपल्या पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास केला असे तुम्ही कधी ऐकले आहे का... हा हे खरे आहे. आपल्या पत्नीला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून या वर्षा एका पतीने आपल्या पत्नीसाठी उपवास केला आहे आणि हा पती म्हणजे दुसरा कोणीही नसून अभिनेता आयुषमान खुराणा आहे.

आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यप ही गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याने या वर्षी ती करवा चौथ करू शकत नाही. पण ताहिराच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आयुषमानने यावेळी करवा चौथ केला आहे आणि त्याने ट्विटरद्वारे त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. आयुषमानने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्या हातावर मेहेंदीने त लिहिलेला दिसत आहे. त म्हणजेच ताहिरा असे देखील त्या फोटोसोबत त्याने लिहिले आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ताहिरा या वर्षी उपवास करू शकत नाही. पण मी तिच्यासाठी उपवास करत आहे. या त्याच्या पोस्टला अनेकांनी लाइक केले असून अनेकांनी आयुषमान हा खूप चांगला पती आहे, असा पती सगळ्यांना मिळाला पाहिजे असे प्रतिक्रियांद्वारे आयुषमानला सांगितले आहे.

आयुषमान सध्या त्याच्या व्यवसायिक आयुष्यात चांगलाच खूश आहे. त्याच्या अंधाधूद आणि बधाई हो या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. आयुषमानला व्यवसायिक आयुष्यात चांगलीच प्रगती मिळत असली तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या चांगल्याच टेन्शनमध्ये आहे. कारण त्याची पत्नी ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून यावर ती उपचार घेत आहे. ताहिरानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट २२ सप्टेंबरला सगळ्यांना सांगितली होती. ताहिरा आणि आयुषमान यांचा प्रेमविवाह असून त्या दोघांना दोन मुले आहेत. 



 

Web Title: Ayushmann Khurrana is fasting on Karwa Chauth for wife Tahira’s long life after her cancer scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.