आयुष्यमान म्हणतो, तो फोन आला आणि माझं नशीब बदलून गेले, आजही मानतो त्या व्यक्तिचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:00 PM2020-03-17T18:00:00+5:302020-03-17T18:00:00+5:30

पत्नी ताहिरा इतकीच ही व्यक्ती ही त्याच्या आयुष्यात महत्त्वाची आहे.

Ayushmann khurrana father called him and his life changed gda | आयुष्यमान म्हणतो, तो फोन आला आणि माझं नशीब बदलून गेले, आजही मानतो त्या व्यक्तिचे आभार

आयुष्यमान म्हणतो, तो फोन आला आणि माझं नशीब बदलून गेले, आजही मानतो त्या व्यक्तिचे आभार

googlenewsNext

आयुष्यमान खुराणा आजघडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. त्याच्याकडे आज कामाची कमतरता नाही. ‘विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल जादा सावधान’पर्यंत त्याच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले.  


आयुष्यमान हा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुष्यमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता.


आयुष्यमानने त्याच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा मुलाखती दरम्यान शेअर केले होता. आयुष्यमान म्हणाला, मी दिल्लीत शिक्षण पूर्ण झाल्यावर रेडिओ जॉकीचे काम करत होता. तेव्हा एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा मला फोन आला आणि त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले.  


 एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी मला मुंबईला जायला सांगितले. हे ऐकून माझं सहकारी हैराण झाले की इकडे सगळं काही ठिक चालू असताना अचनाक मुंबईला का जायचंय. मात्र मी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुंबईत निघून आलो आणि त्यादिवसानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आयुष्मानचे वडील एक प्रसिद्ध ज्योतिषार्चाय आहेत. 


आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

Web Title: Ayushmann khurrana father called him and his life changed gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.