अझर: दुबळी पटकथा मात्र कसदार अभिनय

By Admin | Published: May 14, 2016 12:22 AM2016-05-14T00:22:22+5:302016-05-14T07:32:20+5:30

क्रिकेटच्या विश्वात पर्दापण करून पहिल्या तीन कसोटी सामन्यांत सलग तीन शतके ठोकण्याचा विक्रम करणाऱ्या मोहम्मद अजहरुद्दीनची कारकीर्द मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे डागाळली.

Azhar: The poor screenplay is just stupid acting | अझर: दुबळी पटकथा मात्र कसदार अभिनय

अझर: दुबळी पटकथा मात्र कसदार अभिनय

googlenewsNext

क्रिकेटच्या विश्वात पर्दापण करून पहिल्या तीन कसोटी सामन्यांत सलग तीन शतके ठोकण्याचा विक्रम करणाऱ्या मोहम्मद अजहरुद्दीनची कारकीर्द मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे डागाळली. यशस्वी कारकीर्द आणि बदनामी यांवर आधारित बालाजी आणि सोनी पिक्चर निर्मित ‘अजहर’ या चित्रपटात प्रामुख्याने फिक्सिंगच्या आरोपावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
पर्दापणातच सलग तीन शतके झळकावत हैदराबादच्या मोहम्मद अजहरुद्दीनने (इमरान हाश्मी) यशाच्या पायऱ्या भराभर चढत यशोशिखर गाठल्याने त्याच्यावर भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराची धुरा टाकली जाते. कर्णधार होताच सहकारी खेळाडुंसोबत खटके उडतात आणि ९९ वा कसोटी सामना खेळल्यानंतर मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्याची हकालपट्टी केली जाते.अजहरच्या विरोधात लंडनहून आलेली अ‍ॅड. मीरा (लारा दत्ता) कोर्टात उभी राहते, तर अजहरचा बालपणापासून मित्र रेड्डी (कुणाल राय) अजहरची बाजू मांडतो.
मॅच फिक्सिंगचा आरोप करणारा सट्टेबाज अजहरशी कसा संपर्क करतो. अभिनेत्री संगीताच्या (नरगिस फकरी) प्रेमात पडून आपल्या पत्नीला नौरीन (प्राची देसाई) फारकत देण्याचा घटनाक्रम पूर्वदृश्यचित्रणात (फ्लॅश बॅक) दाखविण्यात आला आहे.
कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने अजहरला मित्रांचीही साथ मिळत नाही; परंतु, त्याला बालपणीचा मित्र रेड्डी न्यायालयीन लढ्यात साथ देत अजहरला न्याय मिळवून देतो. अखेर अजहरवरील बंदी हटविली जाते.
उणिवा : टोनी डिसुझा दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानक दुबळे आहे. अजहर मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात निर्दोष असल्याचे दाखविण्यासाठीच प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. अजहरचे खाजगी आयुष्य, क्रिकेटपटू म्हणून मिळविलेले यश आणि मॅच फिक्सिंगचा आरोप यात ताळमेळ दिसत नाही. पत्नीला घटस्फोट देऊन संगीताशी लग्न करण्याचा निर्णय तो का घेतो, हे उमजत नाही. संगीताचे पात्र खपूच कुमकुवत झाले आहे. विवाहित क्रिकेटपटू अजहरशी ती का जवळीक करते, हेही उलगडत नाही. नौरीन हे पात्र रडगाण्याइतपतच मर्यादित आहे. कायदेशीर युक्तीवादातही दम नाही. मीरा लंडनहून खास हा खटला लढविण्यासाठी का येते? हेही स्पष्ट होत नाही. संगीताच्या भूमिकेत नरगिस कमी पडली. प्राची देसाईच्या वाट्याला रडण्याशिवाय दुसरे काहीच आले नाही. पात्रात कोठेही भावनिक मेळ दिसत नाही. दिग्दर्शक या नात्याने टोनी यांना एक चांगला चित्रपट देण्याची संधी साधता आली नाही.

Web Title: Azhar: The poor screenplay is just stupid acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.