Baap: सबका ‘बाप’...कोई शक...! 80's - 90's गाजवणाऱ्या ‘अॅक्शन हिरों’चा धमाका, पोस्टर पाहिलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 05:12 PM2022-11-10T17:12:09+5:302022-11-10T17:16:17+5:30
Baap Character Look Posters: मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सनी देओल एक अतरंगी सिनेमा घेऊन येत आहेत. याचं पोस्टर पाहून तुम्हीही क्रेझी व्हाल...
Baap Character Look Posters: मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty ), जॅकी श्रॉफ ( Jackie Shroff), संजय दत्त ( Sanjay Dutt ) आणि सनी देओल (Sunny Deol) यांचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, या चौघांनी बुधवारी आपल्या नव्या सिनेमाची घोषणा करत धमाका केला होता. आम्ही घेऊन येतोय, सर्व सिनेमांचा बाप... असं म्हणत त्यांनी चित्रपटाच्या सेटवरचा फोटो शेअर केला होता आणि हा फोटो पाहून चाहते क्रेझी झाले होते. आज गुरूवारी ‘बाप’ सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला. ‘बाप’ असं शीर्षक असलेला हा सिनेमा एक अॅक्शन ड्रामा आहे.
मेकर्सनी मिथुन, जॅकी, संजय व सनी या सर्वांचा फर्स्ट लुक रिलीज करत, वेगवेगळे पोस्टर शेअर केले आहेत.
खलनायक- बल्लू
‘खलनायक’ हा संजय दत्तचा गाजलेला सिनेमा. या सिनेमात त्याने साकारलेल्या ग्रे कॅरेक्टरचं नाव बल्लू होतं. आगामी सिनेमात याच नावासह संजय दत्त धमाका करणार आहे. नव्या चित्रपटात संजय दत्त बल्लूची भूमिका साकारतो आहे.
हिरो- जयकिशन
जय किशन हे नावही तुम्ही ऐकलं असेलच. ‘हिरो’ या चित्रपटातून जॅकी श्रॉफचा डेब्यू झाला होता. या चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव जयकिशन होतं. या नव्या सिनेमात याच नावासह तो परतला आहे.
गदर- अर्जुन
अर्जुन हा सनी देओलच्या फिल्मी करिअरमधील माईलस्टोन सिनेमा आहे. यात सनीचा अँग्री अवतार पाहायला मिळाला होता. नव्या सिनेमात सनी पुन्हा एकदा अर्जुनची भूमिका साकारताना दिसणार आहे.
कोई शक- येडा भगत
कोई शक ..., हा मिथुन चक्रवर्तीचा डायलॉग तुफान गाजला होता. हा डायलॉग त्याच्या अनेक सिनेमात वापरला गेला. नव्या सिनेमात मिथुन येडा भगतची भूमिका साकारणार आहे.
‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात सर्व कलाकारांनी स्वत: स्टंट केले आहेत. अगदी 72 वर्षांच्या मिथुन यांनीही बॉडी डबल घेण्यास नकार दिला. विवेक चौहान या चित्रपटाचा दिग्दर्शक असून हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं आहे आणि लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात होणार आहे.