बाहुबलीला का मारलं, अखेर कटप्पानंच केला खुलासा

By Admin | Published: March 9, 2017 11:34 PM2017-03-09T23:34:45+5:302017-03-09T23:36:05+5:30

कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर अखेर कटप्पा म्हणजेच अभिनेता सत्यराज यांनीच दिलं आहे.

Bahubalila kills, finally disclosed in cutoff | बाहुबलीला का मारलं, अखेर कटप्पानंच केला खुलासा

बाहुबलीला का मारलं, अखेर कटप्पानंच केला खुलासा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9 - कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर अखेर कटप्पा म्हणजेच अभिनेता सत्यराज यांनीच दिलं आहे. दिग्दर्शकानं सांगितल्यानंच कटप्पानं बाहुबलीला मारलं, असं अभिनेता सत्यराज म्हणाले आहेत. 'बाहुबली: द कन्क्ल्युजन'या सिनेमातून कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळणार आहे.

चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून मला सर्वांनी हाच प्रश्न विचारून अक्षरशः छळलंय. पण मला माहीत असूनही मी कुणालाच याचं खरं कारण अद्यापही सांगितलं नाही. दिग्दर्शकांनी मला तशी तंबीच दिली होती. मी माझ्या कुटुंबीयांनाही हे कधीच सांगितलं नाही. मात्र बाहुबली: द कन्क्ल्युजन' या सिनेमात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.

बहुचर्चित सिनेमा 'बाहुबली-द कनक्ल्युजन'च्या लोगोचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. बाहुबली या बहुचर्चित चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दरम्यान, 'बाहुबली: द कन्क्ल्युजन' सिनेमाने रिलीजआधीच 350 कोटींची कमाई केली आहे. वितरण हक्कांमधून कोटींची कमाई करत हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सुपरहिट झाला आहे.
(बहुचर्चित सिनेमा 'बाहुबली 2'चा लोगो रिलीज)
('बाहुबली २'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!)
2015ला आलेल्या बाहुबली या चित्रपटाने सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं होतं. इतका ध्येयवेडा दिग्दर्शक मी कधीच पाहिला नाही. तसंच एखाद्या चित्रपटामागे प्रेक्षक एवढे वेडे होतील, असं वाटलं नव्हत. हा चित्रपट इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा चित्रपट ठरणार आहे, असंही सत्यराज म्हणाले आहेत. बाहुबली या चित्रपटानं जगभरात ६०० कोटींहून अधिक कमाई केली होती. सध्या बाहुबली: द कन्क्ल्युजन चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू असून, प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

Web Title: Bahubalila kills, finally disclosed in cutoff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.