बाजीरावची घोडदौड कायम

By Admin | Published: January 5, 2016 01:01 AM2016-01-05T01:01:19+5:302016-01-05T01:01:19+5:30

नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांना चांगलाच फायदा झाला

Bajirao cradle continued | बाजीरावची घोडदौड कायम

बाजीरावची घोडदौड कायम

googlenewsNext

नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा दिलवाले आणि संजय लीला भन्साली यांचा बाजीराव मस्तानी या चित्रपटांना चांगलाच फायदा झाला. या दोघांमध्ये सध्या चांगलीच टक्कर सुरू आहे. तिसऱ्या आठवड्यातील आकडेवारी बघितली तर बाजीराव मस्तानी चित्रपटाने दिलवालेच्या पुढे मजल मारल्याचे दिसत आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटाची कमाई १६० कोटी आणि दिलवालेची कमाई १३८ कोटी एवढी झाली आहे.
दुसऱ्या आठवड्यातही बाजीरावचीच घोडदौड अधिक असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या आठवड्यात बाजीरावने ७३ कोटी, तर दिलवालेने ५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मागील काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर बाजीरावची कमाई या शुक्रवारी ८.४ कोटी, तर दिलवालेचा व्यवसाय ३ कोटी रुपये एवढा आहे. शनिवारी बाजीरावचा व्यवसाय ५.७० कोटी, तर दिलवालेचा १.९० कोटी इतका आहे.
रविवारी बाजीरावची कमाई ८.४० कोटी, तर दिलवालेची ३.७५ कोटी रुपये आहे.
तिसऱ्या आठवड्यात बाजीरावने १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढा पल्ला गाठणे दिलवालेला अवघड जात आहे. गेल्या दोन आठवड्यांत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्याचा फायदा या दोन्ही चित्रपटांना झाला आहे.
येत्या शुक्रवारी नवीन वर्षातील पहिलाच चित्रपट वजीर प्रदर्शित होत आहे. यात अमिताभ बच्चन, फरहान अख्तर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विधु विनोद चोप्रा यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत बिजाय नंबियार. चोपडा यांच्या बॅनरअंतर्गत येणारा नंबियार यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
फरहान अख्तर यांचाही या बॅनरमधील पहिलाच चित्रपट आहे. अमिताभ यांनी चोपडा यांच्या एकलव्य या चित्रपटात यापूर्वी काम केलेले आहे. फरहानसोबत अदिती राव हैदरी या चित्रपटाची नायिका आहे. जॉन अब्राहम आणि
नील नितीन मुकेश हे चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असणार आहेत. बुद्धिबळाच्या खेळावर आधारित या चित्रपटाकडे बॉलीवूडच्या नजरा लागल्या
आहेत.

Web Title: Bajirao cradle continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.