'मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती…', संदीप पाठकचं 'ते' ट्वीट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 04:04 PM2023-02-25T16:04:53+5:302023-02-25T16:05:31+5:30
Sandeep Pathak :अभिनेता संदीप पाठकने राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे ट्वीट केले आहे. जे चर्चेत आले आहे.
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे. आता मराठी अभिनेता संदीप पाठक(Sandeep Pathak)ने राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे ट्वीट केले आहे. जे चर्चेत आले आहे.
संदीप पाठक याने ट्विट केले की, मा.बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… या ट्वीटमध्ये संदीपने राज्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, आप, राष्ट्रवादी अशा सर्वच राजकीय पक्षांना टॅगही केलं आहे.
मा. बाळासाहेब ठाकरें ची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल.
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) February 24, 2023
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… @BJP4Maharashtra@NCPspeaks@ShivSenaUBT_@mnsadhikrut@INCIndia@AAPMumbai
संदीप पाठकने केलेले हे ट्वीट सध्या चर्चेत आले असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नावे पोस्ट केली आहेत. तर काहींनी खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान होऊ शकतात, असेही म्हटले आहे.
चित्रपट, मालिका, नाटक अशा सर्वच माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात अभिनेता संदीप पाठक यशस्वी झाला आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर उघडपणे व्यक्त होणारा संदीप सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते.