Bappi Lahiri: बॉलिवूडमध्ये बप्पी लहरींमुळे सुरू झाले पॉप कल्चर, 'हे' होते त्यांचे खरे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 09:45 AM2022-02-16T09:45:20+5:302022-02-16T09:46:13+5:30
बप्पी दा यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. ते लहानपणीच तबला, पियानो, ड्रम, गिटार आणि इतर अनेक वाद्ये वाजवायला शिकले होते.
मुंबई: प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचे आज वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. काल रात्री बप्पी लहरी यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच बप्पी दा यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लहरी त्यांच्या संगीताची खास शैली आणि डिस्को गाण्यासांठी ओळखले जायचे. पण, तुम्हाला माहितीये का, बप्पी हे त्यांचे खरे नाव नव्हते.
एका बंगाली कुटुंबात जन्मलेले बप्पी लहरी यांचे खरे नाव आलोकेश लहरी होते. बप्पी दांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. बप्पी लहरी यांना बप्पी दा आणि डिस्को किंग ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. बप्पी दांच्या वडिलांचे नाव अपरेश लहरी आणि आईचे नाव बन्सरी लहरी होते. बप्पी दा यांचा विवाह 24 जानेवारी 1977 रोजी चित्रानी लाहिरीसोबत झाला होता. त्यांना दोन मुले मुलगी रेमा आणि मुलगा बप्पा आहेत.
बालपनीपासून संगीताची आवड
बप्पी दा यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. ते लहानपणी तबला, पियानो, ड्रम, गिटार आणि इतर वाद्य वाजवायला शिकले. बप्पी दा यांना सोन्याची खूप आवड होती, ते नेहमी गळ्यात सोन्याची जाड साखळी, हातात सोन्याच्या अंगठ्या घालत असे. याशिवाय ते नेहमी मोठा चष्मा घालत असे.
80च्या दशकात मिळाली प्रसिद्धी
बप्पी दा यांनी दादू चित्रपटाद्वारे बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच वेळी, नन्हा शिकारी या चित्रपटाद्वारे बॉलीवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. बप्पी दांची गाणी 80 च्या दशकात खूप लोकप्रिय झाली होती. बप्पी दा यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट 1975 मध्ये रिलीज झालेल्या 'जुक्की' चित्रपटातून आला होता. बप्पी लहरी यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून पार्श्वगायकाची भूमिकाही त्यांनी केली आहे.
अनेक सुपरहिट गाणी
बप्पी दा यांनी हिंदी आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांची अनेक गाणी सुपरहिट झाली. मी डिस्को डान्सरसह अशी अनेक गाणी आहेत, जी आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत. बप्पी लहरी हे बॉलीवूड पॉप कल्चर आणण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या सुपरहिट गाण्यांमध्ये बंबई से आया मेरा दोस्त, देखा है मैंने तुझको फिर, रात बाकी बात बाकी, कोई यहां आहा नाचे नाचे, याद आ रहा है, यार बिना चैन कहां रे, दिल में हो तुम और ऊ ला ला यांचा समावेश आहे.