सेम टू सेम

By Admin | Published: September 4, 2016 02:58 AM2016-09-04T02:58:29+5:302016-09-04T02:58:29+5:30

जगात एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात असं आपण ऐकलंय; मात्र एकसारखे दिसणारे चेहरे जगातच नाही, तर आपल्या आजूबाजूलाही तुम्ही पाहिले असतील. तुम्ही जुळ्यांचा विचार

Bean to beans | सेम टू सेम

सेम टू सेम

googlenewsNext

जगात एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात असं आपण ऐकलंय; मात्र एकसारखे दिसणारे चेहरे जगातच नाही, तर आपल्या आजूबाजूलाही तुम्ही पाहिले असतील. तुम्ही जुळ्यांचा विचार करीत असाल, तर तो चुकीचा आहे. कारण, हे चेहरे प्रसिद्ध आहेत आणि तुमच्या-आमच्या अगदी परिचयाचे आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हालाही त्यांच्यात साम्य जाणवेल. या व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचे काही प्रसिद्ध कलाकार. या कलाकारांचे ‘सेम टू सेम’ वाटावे असे चेहरेसुद्धा बॉलीवूडमधलेच. पाहू यात कोण आहेत बॉलीवूडचे ‘सेम टू सेम’ दिसणारे कलाकार...

मधुबाला आणि माधुरी दीक्षित
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सर्वांत सुंदर अभिनेत्रींमध्ये ज्यांचे नाव सर्वोच्च स्थानी आहे अशा अभिनेत्री म्हणजे मधुबाला. त्यांच्या सौंदर्यासह त्यांचा अभिनय, नृत्य, अदा याची कायमच चर्चा झाली. मधुबाला यांच्यासारखे सौंदर्यच नाही, तर त्यांच्यासारखी दिसणारी अभिनेत्री म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने. या दोन्ही अभिनेत्रींचा चेहराच नाही, तर बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आढळते. धकधक गर्ल जेव्हा हसते, तेव्हा तिचे हसणे अगदी मधुबाला यांच्याप्रमाणेच भासते. मधुबाला यांच्याप्रमाणेच माधुरीही उत्तम अभिनेत्री आणि नृत्यातही पारंगत आहे. दोघींमध्येही खास नजाकत पाहायला मिळते. त्यामुळं धकधक गर्ल माधुरीला आजच्या जमान्याची मधुबाला असंही म्हटलं जातं.

रिना रॉय आणि सोनाक्षी सिन्हा
‘शिशा हो या दिल हो..’ हे गाणं रुपेरी पडद्यावर गाताना दिसलेल्या ‘आशा’ सिनेमातल्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रिना रॉय. नागिन, जानी दुश्मन, जख्मी अशा एकाहून एक सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्याकाळी रिना रॉय आणि शॉटगन अर्थात शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘अफेअर’च्या चर्चाही तितक्याच रंगल्या. त्यामुळेच की काय ‘दबंग’ सिनेमात शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा रज्जो म्हणून रुपेरी पडद्यावर अवतरली, त्या वेळी सोनाक्षी ही रिना रॉय यांची कार्बनकॉपी अर्थात ‘सेम टू सेम’ असल्याच्या चर्चा रंगल्या. इतकंच नाही तर अनेकांनी शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांच्या अफेअरचा धागा पकडत सोनाक्षीला त्यांची लेक बनवून टाकलं. रिना रॉय आणि सोनाक्षी यांच्या चेहऱ्यात इतकं काही साम्य आहे की, या चर्चा आपसुकच रंगू लागल्या; मात्र खुद्द शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी आणि रिना रॉय यांनी या सगळ्या गोष्टींचा इन्कार केला; मात्र आजही दोघींच्या चेहऱ्यांमधलं साम्य सहज पाहता येईल.

श्रीदेवी आणि दिव्या भारती
अभिनेत्री श्रीदेवी आणि दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती यांच्या चेहऱ्यातही कमालीचं साम्य पाहायला मिळतं. दोघींचा अभिनय, नृत्य तर दमदार होताच; मात्र त्यांच्या चेहऱ्यात, हसण्यातली समानता कुणालाही चटकन लक्षात येईल अशीच होती.

स्मिता पाटील आणि चित्रांगदा सिंग
बॉलिवूडची डस्की अभिनेत्री असा ज्या अभिनेत्रीचा उल्लेख होतो, ती अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंग. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांची चित्रांगदा ही कार्बनकॉपी असल्याचं बोललं जातं. दोघींच्या चेहऱ्यात बरीचशी समानता आहे. इतकंच नाही तर चित्रांगदाचा अभिनयसुद्धा स्मिता पाटील यांच्यासारखा असल्याचंही बोललं जातं. त्यामुळं स्मिता पाटील यांच्यासारखं दिसण्यापासून ते अभिनयापर्यंत झालेली ही तुलना चित्रांगदासाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावी लागेल.

ऐश्वर्या राय आणि स्नेहा उल्लाल
सलमान खान आणि स्नेहा उल्लाल यांच्या ‘लकी’ या सिनेमाचा प्रोमो पहिल्यांदा रसिकांसमोर आला त्या वेळी सलमान आणि ऐश्वर्या-राय बच्चन पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर एकत्र आले, अशा चर्चा सुरू झाल्या; मात्र नंतर लगेचच स्पष्ट झालं की प्रोमोमध्ये झळकलेली अभिनेत्री ऐश्वर्या नसून, नवोदित स्नेहा उल्लाल आहे. ऐश्वर्या आणि स्नेहा यांच्या चेहऱ्यात इतकं साम्य आहे की, त्या वेळी रसिकसुद्धा फसले. ‘लकी’ सिनेमा पाहताना अनेक सिन्समध्ये स्नेहा नसून ऐश असल्याचाच भास होतो.

कतरिना कैफ आणि झरीन खान
बॉलिवूडची अभिनेत्री झरीन खान हिची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे तिचं अभिनेत्री कॅटरिना कैफसारखं हुबेहूब दिसणं. ‘वीर’ या सिनेमातून झरीननं सलमानसह रूपेरी पडद्यावर एंट्री मारली. कॅटसारखी दिसत असल्यानंच सलमाननं झरीनला या सिनेमात संधी दिल्याच्या चर्चा रंगल्या. कॅटरिनाचा दणकट अवतार म्हणूनही झरीनकडे पाहिलं जातं.

हृतिक रोशन आणि हरमन बावेजा
‘कहो ना प्यार है’ सिनेमातून अभिनेता हृतिक रोशननं हिंदी चित्रपटसृष्टीत दणक्यात एंट्री मारली. अल्पावधीतच अभिनय आणि डान्सनं हृतिकनं रसिकांची मनं जिंकली. एकामागून एक हिट सिनेमांची नोंद हृतिकच्या नावावर झाली. त्यामुळंच की काय हृतिकची लोकप्रियता कॅश करण्यासाठी त्याच्या सारखाच दिसणारा एक अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीत अवतरला. हृतिकसारखा हुबेहूब चेहरा दिसावा यासाठी त्यानं आपल्या चेहऱ्यावर सर्जरी केल्याचंही बोललं गेलं. हा अभिनेता म्हणजे हरमन बावेजा. हृतिक आणि हरमनच्या चेहऱ्यात बरंच साम्य पाहायला मिळतं; मात्र हे साम्य नैसर्गिक नसून हरमननं ते घडवून आणल्याच्या चर्चाच जास्त रंगल्या.

Web Title: Bean to beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.