ब्यूटी विथ ब्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 18:39 IST2016-11-08T15:13:00+5:302016-11-08T18:39:15+5:30

एक जमाना होता की, अभिनेत्री केवळ ‘अभिनय एक्केअभिनय’ असाच विचार करायच्या. मात्र, हल्लीच्या अभिनेत्री अभिनयाबरोबरच इतर क्षेत्रातही वेगवेगळे प्रयोग ...

Beauty With Brain | ब्यूटी विथ ब्रेन

ब्यूटी विथ ब्रेन

एक जमाना होता की, अभिनेत्री केवळ ‘अभिनय एक्केअभिनय’ असाच विचार करायच्या. मात्र, हल्लीच्या अभिनेत्री अभिनयाबरोबरच इतर क्षेत्रातही वेगवेगळे प्रयोग करण्याचे धाडस दाखवित आहेत. प्रियंका एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच, शिवाय निर्मिती क्षेत्रातही ती नशीब आजमावत आहे. प्रियंका स्वत:च्या पर्पल पेब्बल पिक्चर्स प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत ‘बमबम बोल रहा है काशी’ हा भोजपुरी सिनेमाही निर्माण करीत आहे. नुकतीच तीने मराठी चित्रपटाची निर्मितीही केली आहे. खरं तर प्रियंकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडबरोबर हॉलिवूडमध्येही स्वत:चा लौकिक निर्माण केला. अशात तिचे निर्मिती क्षेत्रातील काम नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र, असा कारनामा करणारी प्रियंका एकमेव अभिनेत्री नसून, इतरही काही अभिनेत्रींनी अभिनयाबरोबरच निर्मितीक्षेत्रात आपले नशीब आजमावले आहे. 



अनुष्काचा ‘एनएच-१०’
बॉलिवूडच्या तिन्ही खानबरोबर काम केलेल्या अनुष्का शर्मा या हरहुन्नरी अभिनेत्रीनेदेखील निर्मिती क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. ‘क्लीन स्लेट फिल्मस’ या स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत ‘एनएच-१०’ या चित्रपटाची तिने निर्मिती केली. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगले कलेक्शन केलेच, शिवाय समीक्षकांकडून कौतुकही मिळवले. आता ती दलजीत दोसांझ यांच्यासोबत ‘फिल्लोरी’ नावाचा चित्रपट निर्माण करीत आहे. 


लाराने दिला ‘चलो दिल्ली’चा नारा
बॅटमिंटनपटू महेश भूपती याच्याशी विवाह केल्यानंतर बॉलिवूडमधून गायब झालेली लारा दत्ता सध्या चित्रपट निर्मितीत करिअर करीत आहे. आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणाºया लाराने स्वत:च्या ‘बिग डॅडी’ या प्रॉडक्शन कंपनीच्या माध्यमातून ‘चलो दिल्ली’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात एकही बडा कलाकार नसतानादेखील बॉक्स आॅफिसवर चित्रपटाने चांगला गल्ला जमविला. सध्या लारा ‘चलो दिल्ली’ या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करीत असल्याचे समजते. 


सोनमने दिली बहिणीला साथ
बहीण रिया कपूर हिच्या सोबत सोनम कपूर हिने ‘आयशा’ आणि ‘खुबसूरत’ हा चित्रपट निर्माण केला. आयशा बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. ‘खुबसूरत’ या चित्रपटाने चांगला बिझनेस केला. त्यानंतर तिने ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपटदेखील प्रोड्यूस केला आहे. सध्या ती ‘बॅटल आॅफ बिटोरा’ या चित्रपटाच्या प्रॉडक्शनवर काम करीत आहे. फॅशनसाठी ओळख असलेल्या सोनमने अभिनयातदेखील छाप सोडली आहे. आता ती प्रॉडक्शनमध्येही नशीब आजमावत असल्याने तिचे सर्वत्र कौतुकही होत आहे. 


प्रीतीचा ‘इश्क इन पॅरिस’
एकेकाळी बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री असलेल्या प्रीती झिंटा हिनेदेखील निर्माती म्हणून लौकिक मिळविला आहे. अभिनयातून गायब झालेल्या प्रीतीने ‘इश्क इन पॅरिस’ हा चित्रपट प्रोड्यूस करून, ती आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय असल्याचेच दाखवून दिले आहे. सध्या प्रीती वैवाहिक जीवन जगत असून, भविष्यात ती आणखी काही चित्रपटांची निर्मिती करू इच्छित असल्याचे समजते. 


शिल्पाचा ‘ढिश्कियाऊं’
आपल्या ठुमक्यांनी यूपी-बिहार लुटणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही प्रोड्यूसर होण्याचा मान मिळवला आहे. सध्या शिल्पाने अभिनयातून रिटायर्मेंट घेतली आहे. मात्र, याचा अर्थ ती लाइम लाइटच्या दुनियेतून दूर गेली आहे, असा अजिबात नाही. तिच्या इसेंटल स्पोर्टस अ‍ॅण्ड मीडिया या कंपनीअंतर्गत ‘ढिश्कियाऊं’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नसला, तरी शिल्पाचे मात्र सर्वत्र कौतुक झाले. 


अमिषाने दाखविले ‘देशी मॅजिक’
‘गदर एक प्रेमकथा’ या सिनेमातून अभिनयाची चुणूक दाखविणारी अमिषा पटेल सध्या इंडस्ट्रीमधून गायब आहे. रोलच्या शोधात असलेल्या अमिषाने अखेर ‘अमिषा पटेल प्रॉडक्शन्स’ अशा स्वत:च्याच नावाने प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. या अंतर्गत तिने ‘देशी मॅजिक’ या चित्रपटाची निर्मिती केली. परंतु, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही.  त्याचबरोबर जुही चावला, दिया मिर्झा, सुष्मिता सेन, मनीषा कोईराला, पूजा भट्ट यांनीदेखील प्रॉडक्शन क्षेत्रात करिअर आजमावले आहे. 

Web Title: Beauty With Brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.