अनुष्कामुळे करण-ऐश्वर्याच्या मैत्रीत फूट
By Admin | Published: March 24, 2017 06:13 PM2017-03-24T18:13:35+5:302017-03-24T19:55:46+5:30
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मैत्रीत कटूता आला आहे. दोघांच्या मैत्रीतील हा अबोला अनुष्का शर्मामुळे आल्याचे वृत्त आहे.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मैत्रीत कटूता आला आहे. दोघांच्या मैत्रीतील हा अबोला अनुष्का शर्मामुळे आल्याचे वृत्त आहे. अलीकडे ऐश्वर्याच्या वडिल कृष्णराज रायचे निधन झाले. यावेळी सगळे जवळचे मित्र ऐश्वर्याचे सांत्वन करायला पोहोचले. पण यात एक चेहरा मिसींग होता. हा चेहरा म्हणजे, करण जोहर. करण जोहरने सांत्वनाला स्वत न येता आपल्या आईला पाठवल्याने दोघांच्या मैत्रीत दूरावा आल्याचे बॉलिवूडमध्ये बोललं जात आहे.
ऐश्वर्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला वा श्रद्धांजली सभेला करण जोहर कुठेच हजर नव्हता. याकारणामुळे ऐश्वर्या आणि करण सध्या बोलतं नाहीत. करण जोहरची ही चूक़ ऐश्वर्याने चांगलीच मनाला लावून घेतली असल्याचे कळतेय. दोघांमध्ये यावरूनच सध्या मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.
दिवाळी 2016 मध्ये रणबीर-अनुष्का-ऐश्वर्या स्टारर ऐ दिल है मुश्किल चित्रपट आला होता. यावेळी अनुष्कावरुन करण आणि ऐश्वर्यामध्ये मतभेद झाले होते. या या चित्रपटात ऐश्वर्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. प्रमोशनला आपल्यापेक्षा आधिक अनुष्का शर्माला अधिक किंमत दिल्यामुळे करणवर ऐश्वर्या नाराज होती. आणि तेव्हापासूनच दोघांच्या नात्यात फूट पडल्याचे वृत्त आहे. त्यात करणने कृष्णराज राय यांच्या अंत्यसंस्काराला वा श्रद्धांजली सभेला न येऊन त्यात भर टाकल्याचे बोललं जात आहे.
ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाकडून ऐश्वर्याला ब-याच अपेक्षा होत्या. कदाचित त्याचमुळे रणबीर कपूरसोबत एकदम हॉट फोटोशूट करायलाही तिने मागेपुढे पाहिले नाही. पण जेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनची गोष्ट आली, तेव्हाच सगळे बिनसले. प्रमोशनच्या ऐनवेळी अनुष्का शर्मा आपल्या फिल्लोरी या चित्रपटात बिझी झाली होती.
इतकी की, प्रमोशनसाठी वेळ काढणे तिला अशक्य झाले होते. पण अनुष्काशिवाय प्रमोशन करायला करण तयार नव्हता. ऐश्वर्याने काही इव्हेंटमध्ये अनुष्काशिवाय प्रमोशन करण्याची तयारी दाखवली. पण करणने त्यास नकार दिला. त्याने अनुष्काशिवाय प्रमोशन करण्यास ऐश्वर्याला मनाई केली. लोकांना या चित्रपटात ऐश्वर्या लीड रोलमध्ये आहे, असे वाटू नये, असे करणचे मत होते. नेमकी हीच बाब ऐश्वर्याला खटकली. तेव्हापासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
ऐ दिल है मुश्किलनंतर करण ऐश्वर्याकडे आणखी एका चित्रपटाची ऑफर घेऊन गेला. पण ऐश्वर्याने त्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून दोघांमध्ये अबोला असल्याचे कळतेय.