या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 08:00 PM2019-04-14T20:00:00+5:302019-04-14T20:00:00+5:30
लोकसभा निवडणुकीला नुकतीच सुरूवात झाली असून सगळीकडे निवडणूकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यात बॉलिवूडचे काही कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत.
लोकसभा निवडणुकीला नुकतीच सुरूवात झाली असून सगळीकडे निवडणूकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यात बॉलिवूडचे काही कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत. या कलाकारांच्या यादीत आलिया भट, दीपिका पादुकोण, कतरिना कैफ व अक्षय कुमार या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.
आलिया भट
आलिया भटकडे देखील भारताचे नागरिकत्व नाही आहे. कारण तिची आई सोनी राजदान ब्रिटिशर आहे. त्यामुळे आलियाकडे भारताचा पासपोर्ट नाही. आलिया जेव्हा ब्रिटीश पार्टपोर्ट रद्द करेल तेव्हाच ती मतदानाचा हक्क बजावू शकते.
दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोणचा जन्म डेन्मार्कची कॅपिटल कोपेनहेगनमध्ये झाला आहे आणि तिच्याकडे तिथले नागरिकत्व आहे. दीपिकाकडे डेन्मार्कचा पासपोर्ट आहे. त्यामुळे ती देखील मतदान करू शकत नाही.
कतरिना कैफ
कतरिना कैफचा जन्म हाँग काँगमध्ये झाला असून ती बऱ्याच देशात राहिली आहे. तिच्याकडे देखील ब्रिटेनचा पासपोर्ट आहे. त्यामुळे तिच्याकडे ब्रिटेनचे नागरिकत्व आहे.
अक्षय कुमार
अक्षय कुमारचा जन्म अमृतसरमध्ये झाला आहे आणि लहानाचा मोठा तो दिल्लीत झाला आहे. मात्र चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अक्षय बँकॉकमध्ये मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत होता. त्यावेळी त्याने भारताच्या नागरिकत्वाचा त्याग केला होता. त्याच्याकडे कॅनडाचे पासपोर्ट आहे. त्यामुळे तोदेखील मतदान करू शकत नाही. कॅनडाने त्याला तिकडचे नागरिकत्व सन्मानार्थ दिले आहे.
जॅकलिन फर्नांडिस
२००६ साली मिस श्रीलंका हा किताब पटकावणारी जॅकलिन फर्नांडिसकडे श्रीलंकाचा पासपोर्ट आहे.
इमरान खान
इमरान खानकडे अमेरिकेचा पासपोर्ट असल्यामुळे तो मतदानाचा हक्क बजावू शकत नाही.
सनी लियोन
सनी लियोनचा जन्म कॅनडातील ऑन्टारियोमध्ये झाला आहे. तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यामुळे मतदान करू शकत नाही.
नरगिस फाखरी
नरगिस फाखरीकडे अमेरिकेचा पासपोर्ट आहे.