'बाहुबली 2'च्या क्लायमॅक्स सीन शुटिंगला सुरुवात
By Admin | Published: June 16, 2016 10:24 AM2016-06-16T10:24:19+5:302016-06-16T11:20:55+5:30
चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी ट्विटरवरुन 'बाहुबली 2' चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शुटिंगचा फोटो शेअर केला आहे
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि, 16 - 'बाहुबली 2' चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. 2015 मध्ये आलेल्या बाहुबली चित्रपटाने धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. त्याचा दुसरा भाग पुढील वर्षी रिलीज करण्यात येणार असून त्याच्या क्लायमॅक्स सीनच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे क्लायमॅक्स सीनवर तब्बल 30 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी ट्विटवरुन शुटिंग सेटवरचा फोटो शेअर केला आहे. अनेक महिने केलेल्या प्लानिंगमुळे सर्व व्यवस्थित पार पडण्यास मदत झाली..जय माहिश्मती असं ट्विट राजामौली यांनी केलं आहे. 14 एप्रिल 2017 ला 'बाहुबली 2' रिलीज होत आहे. आणि चित्रपटप्रेमींना पडलेला महत्वाचा प्रश्न कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? याचं उत्तरही याच दिवशी मिळणार आहे.
Fantastic first day at war...
Months of planning helped everything roll out smoothly..
Jai Mahishmathi..!! pic.twitter.com/jhrblrtc4n— rajamouli ss (@ssrajamouli) June 13, 2016