स्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 01:45 PM2018-04-19T13:45:31+5:302018-04-19T19:15:31+5:30

अबोली कुलकर्णी ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या स्टार प्लस वाहिनीवरील हिंदी मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री अंजली आनंद ही लव्हली या व्यक्तिरेखेत ...

Believe in your own talent - Anjali Anand | स्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद

स्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी

‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या स्टार प्लस वाहिनीवरील हिंदी मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री अंजली आनंद ही लव्हली या व्यक्तिरेखेत दिसत आहे. ही तिची दुसरी मालिका असून यात ती एका आईच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेपर्यंतचा तिचा प्रवास कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी मारलेल्या या गप्पा...

*  ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या शोमध्ये तू सिकंदर गिल यांची पत्नी लव्हली हिच्या भूमिकेत दिसत आहेस. काय सांगशील कशी आहे लव्हली?
- लव्हली ही स्वत:च्या मर्जीची मालकीण आहे. तिला एक छोटी मुलगीही आहे. तिला असं वाटतं की, तिच्या वडिलांप्रमाणे तिची मुलगी देखील एक गायिका बनावी. तिचे तिच्या मुलीवर खूप प्रेम असते. तिची मुलगी बऱ्याचदा तिच्या वडिलांचे म्हणणे ऐकते तर तर ती तिच्या आईच्या खुप जवळ असते. 

* ‘ढाई किलो प्रेम’ या मालिकेत तू दिपीकाची व्यक्तिरेखा साकारली होती. ग्रे शेड असलेल्या लव्हलीची भूमिका करण्याचा विचार कसा आला? तसेच तू एका आईच्या भूमिकेत दिसत आहेस तर कसा होता अनुभव? 
- एक कलाकार म्हणून मी माझ्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिका केल्याच पाहिजेत. कारण तीच एक प्रोसेस आहे की, जी मला एक कलाकार म्हणून समृद्ध करते. त्यामुळे लव्हलीची भूमिका मला निगेटिव्ह प्रकारची वाटत नाही. तिचे तिचा पती आणि मुलगी यांच्यावर खूप प्रेम असते. ते साहजिकच कोणत्याही आईचे आपल्या कुटुंबावर असतेच. मात्र, यात एका आईची भूमिका करताना मला नक्कीच मजा येत आहे.

* मोहित मलिक आणि मालिकेच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? 
- मालिकेची टीम खूप चांगली आणि कायम सहकार्य करणारी आहे. आमच्यात एक बाँण्डिंग तयार झालं आहे. मोहितला तर मी पहिल्यापासूनच ओळखते. आम्ही दोघेही खूप वेगवेगळे कलाकार आहोत. एकमेकांकडून  कायम काही ना काही शिकत असतो. 

* लव्हलीची भूमिका केल्यानंतर तुझ्या चाहत्यांच्या कशा प्रतिक्रिया तुला मिळाल्या? 
- ज्या पे्रक्षकांनी मला दीपिकाच्या रूपात पाहिलंय ते आता माझ्या लव्हलीच्या भूमिकेमुळे फार खुश नाहीत. पण, प्रेक्षकांनाही तुम्हाला एक कलाकार म्हणून गृहित धरणं खुप कठीण असतं. जर त्यांना लव्हलीच्या भूमिकेचा राग येत असेल तर नक्कीच माझा अभिनय चांगला होत आहे, असे मी मानेन.

* ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या दुसऱ्या  मालिकेत काम केल्यानंतर काय वाटते आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी? 
- आत्तापर्यंतचा प्रवास खूपच अनपेक्षित होता. सुरूवातीच्या काळात अनेक टीकांनाही सामोरे जावे लागले. मात्र, नंतर मीच स्वत:ची प्रेरणा बनून स्वत:ला सिद्ध करत गेले. या क्षेत्रात जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हालाही यशाचा मार्ग दिसत नाही. त्यामुळे अजूनही नवनव्या गोष्टी मी शिकतच आहे, शिकत राहीन.

* वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यातील अंतर कसे सांभाळतेस?
- कलाकाराचं आयुष्य दिसतं तितकं सोप्पं आणि सहज नसतं. कारण त्याला आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वत:साठी आम्हाला वेळ हा काढावाच लागतो अन्यथा आमचं वैयक्तिक आयुष्याला काही अर्थच उरणार नाही. 

* अभिनय तुझ्यासाठी काय आहे?
- मी सेटवर दररोज जे आयुष्य जगते त्यालाच मी अभिनय असं म्हणेन. कारण अभिनयाशिवाय माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट फार महत्त्वाची असू शकत नाही. रोज मी माझ्या अनुभवातून बरंच काही शिकत असते. 

* तुझा सोशल मीडिया कनेक्ट कसा आहे?
- मी सोशल मीडियावर फार काही अ‍ॅक्टिव्ह नाहीये. मला असं वाटतं की, हे माझं वैयक्तिक मत आहे की, मला स्वत:चं विश्व सगळयांसोबत शेअर करायचं नाहीये. काही बाबतीत मी स्वत:ला काही बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे मी सोशल मीडियापासून स्वत:ला दूरच ठेवते. 

* टीव्ही इंडस्ट्रीतील स्ट्रगलर्सना तू कोणता संदेश देशील?
- मला असं वाटतं की, स्ट्रगलर्स हा शब्दच नाहीये. कारण, या इंडस्ट्रीत आलेला प्रत्येक जण त्याच्या उत्तम अभिनयासाठी कायम मेहनत घेत असतो. त्याने कितीही यश संपादन केले तरीही तो आयुष्यभर काहीतरी नवीन शिकत राहतो. फक्त एवढेच सांगेन की, इंडस्ट्रीत काम करत असताना सहनशक्ती तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक असतं. स्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा म्हणजे सर्वकाही सुकर होईल.

Web Title: Believe in your own talent - Anjali Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.