एक अलबेला : भगवान दादा

By Admin | Published: June 24, 2016 11:54 AM2016-06-24T11:54:40+5:302016-06-24T11:56:53+5:30

चित्रपटसृष्टीतील डान्सिंग सुपरस्टार भगवान दादा यांच्या आयुष्यावर आधारित 'एक अलबेला' हा चित्रपट आज प्रदर्शित होणार त्यानिमित्त भगवान दादांबद्दलचे काही किस्से

A bewilder: Lord Dada | एक अलबेला : भगवान दादा

एक अलबेला : भगवान दादा

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ -  चित्रपटसृष्टीतील डान्सिंग सुपरस्टार भगवान दादा यांच्या आयुष्यावर आधारित 'एक अलबेला' हा चित्रपट आज प्रदर्शित होणार असून अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भगवान दादांबद्दलचे किस्से....
 
> गिरगावच्या मॅजेस्टिक थिएटरमध्ये त्यांनी मास्टर विठ्ठल यांचा सिनेमा पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला. पुढे भगवान दादांचं नशीब पहा त्यांना मास्टर विठ्ठल यांच्यासह कामाची संधी लाभली. 
 
> संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र हे भगवान दादा यांचे चांगले मित्र होते. सी.रामचंद्र यांना इंडस्ट्रीत भगवान दादा यांनी पहिली संधी दिली.  
 
> भगवान दादा यांचा पहिला सिनेमा बेवफा आशिक हा होता. यांत त्यांनी hunchman ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी भगवान दादांचा लूक असा काही होता की कुणीही त्यांना ओळखू शकलं नाही, त्यामुळेच हा सिनेमा सुपरहिट ठरला.
 
> सगळ्यांत आधी 1942 मध्ये भगवान दादा यांनी 'बदला' या हिंदी सिनेमात हाणामारीच्या दृष्यांची सुरूवात केली त्यामुळेचं त्यांना पहिला अॅक्शन हिरो म्हणूनही ओळखलं जातं. 
 
 
 
> भगवान दादा यांना 'शेवर्ले कार' खूप आवडायच्या. या कारचं त्यांना असं काही आकर्षण होतं की त्यांनी 'शेवर्ले'नावाच्या सिनेमातही काम केलं.
 
> भगवान दादा यांनी वनमोहिनी आणि जयक्कोडी या तमिळ सिनेमांचं दिग्दर्शन केलं. अलबेला आधी हे दोन्ही सिनेमा हिट ठरले.
 
> एका सिनेमात भगवान दादा यांच्या हिरोईन ललिता पवार होत्या. सिनेमातील एका दृष्यांत  भगवान दादा यांना ललित पवार यांच्या श्रीमुखात लगावयाची होती , भगवान दादा यांची शरिरयष्टी भक्कम असल्यानं त्यांनी ललिता पवार यांना मारलेली कानाखाली  त्यांना चांगलीच महागात पडली.त्यांना कानाखाली खाल्ल्यामुळे डोळ्याला झालेली ईजा आय़ुष्यभर राहिली. 
 
 
> फाळणीच्या नंतर उसळलेल्या दंगलीच्या वेळी  भायखळा ,भेंडी बाजार परिसरात राहणा-या अनेक मुस्लिम कलाकार, तंत्रज्ञानांना त्यांनी संरक्षण दिले होते. यांतून त्यांचा सर्वधर्म समभाव हा गुण दिसून आला. 
 
> भगवान दादा यांनी 1949 मध्ये 'भेदी बंगला' हा पहिला हॅारर सिनेमा बनवला. 
 
> भगवान दादा यांच्या सिनेमात काम करण्याला त्यांच्या वडिलांचा विरोध होता. 1930 साली त्यांनी एका भूमिकेसाठी मिशा काढल्या होत्या त्यावेळी भगवान दादा यांना त्यांच्या वडिलांचा ओरडा खावा लागला होता. 
 
> भगवाना दादा हॅालिवूड एक्टर  डग्लस फेयरबैंकचे मोठे चाहते होते.  भगवान दादा डग्लस प्रमाणे स्टंट करताना कोणताही डमीचा वापर करत नसत,  त्यामुळे भगवान दादा यांना राज कपूर इंडियन डग्लस अशीही हाक मारत असत.
 
 
> भगवान दादा यांनी जवजळपास 200 सिनेमांत काम केलं आहे. त्यांना एकदा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एका सिनेमात पैशांचा पाऊस दाखवायचा होता. त्यासाठी त्यांनी ख-याखु-या नोटांचा वापर केला.
 
> गोरेगांवमध्ये भगवान दादांच्या सिनेमांच्या चित्रफितींचं गोदाम होतं. मात्र या गोदामाला अचानक लागलेल्या आगीत १९४० पर्यंतच्या चित्रफिती जळून खाक झाल्या.
 
> चेंबूरच्या आशा स्टूडियोच्या परिसरात भगवान दादा यांचा बंगला होता. काही महिने ते इथं राहिले, मात्र त्यांचं मन इथं रमलं नाही. त्यांना दादरच्या जुन्या घरी राहायला आवडायचं. अखेरच्या  श्वासापर्यंत ते याच घरात राहिले.
 
> भगवान दादांच्या काळात सिनेमात नृत्य करण्यासाठी कलाकार मिळत नव्हते. त्यामुळे 'अलबेला' सिनेमातील 'शोला जो भडके'.... या गाण्यासाठी फायटर्सचा वापर करण्यात आला होता.

 

 

Web Title: A bewilder: Lord Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.