भाग्यश्री मोटेनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, आसाममधील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:22 PM2024-11-19T12:22:42+5:302024-11-19T12:23:44+5:30

सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

Bhagyashree Mote Visited Mrityunjay Mandir And Maa Kamakhya Temple Assam Photos Viral | भाग्यश्री मोटेनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, आसाममधील फोटो व्हायरल

भाग्यश्री मोटेनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, आसाममधील फोटो व्हायरल

Bhagyashree Mote In Assam : भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. भाग्यश्रीने मराठी-हिंदी सिनेमांसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलंय. सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. परंतु, आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्रीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

भाग्यश्रीने आपल्या दोन दिवसाच्या प्रवासात  पहिल्यांदा आसाममधील महा मृत्यूंजय मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ती कामाख्या देवीच्या मंदिरात नतमस्तक झाली. भाग्यश्री या प्रवासात भक्तीत तल्लीन झालेली दिसली. यावेळी तिने मंदिराच्या आवारातील फोटोही क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या सुंदर प्रवासाची एक झलक पाहायला मिळाली. 

आसाममध्ये गेल्यावर भाग्यश्रीने तिचा अनुभव शेअर केलाय. पोस्टमध्ये भाग्यश्री लिहिते, माझ्या आसामच्या प्रवासाची झलक...  पहिल्या दिवशी अद्भुत अशा 'मृत्युंजय मंदिरा'त दर्शन घेतलं. जो एक रचनात्मक उत्कृष्ट नमुना आहे आणि दुसऱ्या दिवस 'मां कामाख्या'च्या आशीर्वाद घतेला. खूप सुंदर प्रवास मी या दोन दिवसांत केला आहे! खूप धन्य वाटतंय!".

भाग्यश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने 'देवो के दे महादेव' आणि 'सिया के राम' या पौराणिक मालिकांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय 'गणपती बाप्पा मोरया' या मराठी मालिकेत तिने माता पार्वतीची भूमिका साकारली होती. भाग्यश्रीने स्कॅम फेम अभिनेता प्रतीक गांधीसोबत 'भवई' सिनेमात काम केलंय. भाग्यश्री मोटेच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Bhagyashree Mote Visited Mrityunjay Mandir And Maa Kamakhya Temple Assam Photos Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.