Bigg Boss 12: सलमानची Secret Wife बनत घरात एंट्री करणार भारती सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 04:20 PM2018-10-05T16:20:59+5:302018-10-05T16:23:39+5:30
भारती आणि हर्षची जोडी ‘बिग बॉस 12’मध्ये दिसणार, असे जाहिर करण्यात आले होते. गोव्यातील ‘बिग बॉस 12’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये या कपलने हजेरी लावली होती.
![Bharti Singh to Enter Bigg Boss 12 house as Salman Khan's wife? Details inside | Bigg Boss 12: सलमानची Secret Wife बनत घरात एंट्री करणार भारती सिंह Bharti Singh to Enter Bigg Boss 12 house as Salman Khan's wife? Details inside | Bigg Boss 12: सलमानची Secret Wife बनत घरात एंट्री करणार भारती सिंह](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/bharti-in-bigg-boss_201810141791.jpg)
Bigg Boss 12: सलमानची Secret Wife बनत घरात एंट्री करणार भारती सिंह
रसिकांना खळखळून हसायला लावत त्यांचं तुफान मनोरंजन करणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. यावेळी तिला चक्क साथ मिळाली आहे ती दंबग खान सलमानची.प्रत्येक मुलींना सलमान खान सारखा बॉयफ्रेंड मिळावा किंवा पती मिळावा असे स्वप्न असणार. अगदी कॉमेडी क्वीनचीही असेच काहीसे स्वप्न असणार. मात्र आता तिचे हे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. कारण भारतीला चक्क सलमानची पत्नी बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
होय, कॉमेडियन भारती सिंह, बिग बॉग 12 शोमध्ये विकेंड का वार या भागात सलमानसह या भागाचे होस्ट करणार आहे. आगामी सलमानची पत्नी बनत शोमध्ये एंट्री करणार आहे. विशेष म्हणजे या दोघांना 9 मुलंही असल्याचे दाखवण्यात येणार आणि हे 9 मुलंही बॉलिवूडचे वेगवेगळे कॅरेक्टर सादर करतील.
भारती आणि हर्षची जोडी ‘बिग बॉस 12’मध्ये दिसणार, असे जाहिर करण्यात आले होते. गोव्यातील ‘बिग बॉस 12’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये या कपलने हजेरी लावली होती. पण शोच्या प्रीमीअरमध्ये भारती-हर्ष दिसले नाहीत. यानंतर आता ही जोडी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डवर एन्ट्री करू शकते, असे मानले जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांनाही डेंग्युची लागण झाल्याची बातमी आली होती.यातून आता भारती आणि हर्ष प्रकृती आता चांगली असून त्यांनी कामालाही सुरूवात केली आहे.
स्टार वन चॅनलवरील 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोची भारती सेकंड रनअरप होती. या शोमुळेच प्रकाश झोतात आलेली भारती नंतर अनेक टीव्ही शोमध्ये कॉमेडी स्कीट आणि होस्ट करताना दिसली.'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी नाईट बचाव', 'झलक दिखला जा' 'इंडियाज गॉट टॅलेंट' अशा विविध रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे. भारती सिंह एक उत्तम कलाकारा कॉमेडी क्विन म्हणूनही ओळखली जाते.हर्ष हा लेखक असून त्याने काही कॉमेडी शोजसाठी लेखक म्हणून काम केले आहे.