भाऊ कदमने भर रस्त्यात गाडी थांबवून घेतली वयोवृद्ध चाहत्यांची भेट; पुढे घडलं असं काही की भारावला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 01:33 PM2024-11-15T13:33:29+5:302024-11-15T13:37:20+5:30

सोशल मीडियावर भाऊ कदम यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

bhau kadam stopped the car on the road and meet the elderly fans video viral on social media  | भाऊ कदमने भर रस्त्यात गाडी थांबवून घेतली वयोवृद्ध चाहत्यांची भेट; पुढे घडलं असं काही की भारावला अभिनेता

भाऊ कदमने भर रस्त्यात गाडी थांबवून घेतली वयोवृद्ध चाहत्यांची भेट; पुढे घडलं असं काही की भारावला अभिनेता

Bhau Kadam Video: भालचंद्र कदम अर्थात भाऊ कदम (Bhau Kadam) हे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध असं नाव आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. अनेक भूमिकांमधून त्यांने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. भाऊ कदम याने 'नशीबवान', 'कुटुंब', 'गोळाबेरीज', 'टाइमपास', 'बाळकडू', 'पांडू' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. उत्तम अभिनय कौशल्य आणि विनोदबुद्धी यांच्या जोरावर भाऊ कदमने इंडस्ट्रीत स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं. चाहत्यांमध्ये कायमच त्यांची क्रेझ पाहायला मिळते. अलिकडेच सोशल मीडियावर भाऊ कदम यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर भाऊ कदमने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक दाम्पत्य त्यांच्या गाडीजवळ येऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी भर रस्त्यात गाडी थांबवून त्यांनी चाहत्यांची भेट घेतली.  त्यांचं प्रेम आणि आपुलकी पाहून भाऊ कदमही त्यांना आनंदाने फोटो काढतो. अगदी प्रेमाने त्यांच्यासोबत तो संवाद साधताना दिसत आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना साधेपणा जपणारा माणूस म्हणून चाहते त्याला ओळखतात. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांच्यासाठी कौतुकोद्गार काढले आहेत. 

सोशल मीडियावर भाऊ कदमचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर भाऊ "अशीच माणुसकी राहू तुम्ही आयुष्यभर असंच हसत रहा", अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका यूजरने व्हिडीओवर "देवमाणूस" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: bhau kadam stopped the car on the road and meet the elderly fans video viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.