भाऊ कदमची लेक रमली हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात; शेअर केला सुरेख व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:45 PM2024-06-27T17:45:00+5:302024-06-27T17:45:00+5:30

Mrunmayee kadam: मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राममध्ये तिच्या हिमाचल प्रदेशच्या व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती एका ग्रुपसोबत तिचं व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेल्याचं दिसून येत आहे.

Bhau Kadam's daughterMrunmayee kadam Himachal Pradesh trip video | भाऊ कदमची लेक रमली हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात; शेअर केला सुरेख व्हिडीओ

भाऊ कदमची लेक रमली हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात; शेअर केला सुरेख व्हिडीओ

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमासह 'नशीबवान', 'कुटुंब', 'गोळाबेरीज', 'टाइमपास', 'बाळकडू', 'पांडू' अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे भाऊ कदम. उत्तम अभिनय कौशल्य आणि विनोदबुद्धी यांच्या जोरावर भाऊ कदमने इंडस्ट्रीत स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे त्याची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. परंतु, सध्या नेटकऱ्यांमध्ये भाऊ कदमच्या लेकीची म्हणजेच मृण्मयी कदमची चर्चा होतीये.

मृण्मयी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिचं युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती तिच्या बिझनेसची, तिच्या पर्सनल आयुष्याची माहिती नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने हिमाचल प्रदेशमधील एक छान व्लॉग शेअर केला आहे.

मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राममध्ये तिच्या हिमाचल प्रदेशच्या व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती एका ग्रुपसोबत तिचं व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या टूरमध्ये तिच्यासोबत तिची धाकटी बहिणीदेखील होती.

मृण्मयीने इन्स्टाग्रामवर शॉर्ट व्हिडीओ शेअर करत हिमाचलमधील अपडेट चाहत्यांना दिले आहेत. चहू बाजूने डोंगरदऱ्या, खळखळणाऱ्या नद्या, तेथील साधी राहणीमान असलेले लोक, शाळा असं सारंकाही तिने या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ तिने हिमाचलमधील चिटकूल या छोट्याशा गावात शूट केला आहे.

Web Title: Bhau Kadam's daughterMrunmayee kadam Himachal Pradesh trip video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.