मराठीतील बिग बजेट चित्रपट ‘बाहुबली’चेही रेकॉर्ड मोडणार!

By Admin | Published: July 23, 2015 03:26 AM2015-07-23T03:26:25+5:302015-07-23T03:26:25+5:30

‘देऊळबंद’ या चित्रपटासाठी कोठेही तडजोड केली नाही. सहा राज्यांमध्ये कथा घडत असल्याने, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन

Big Bets Movie 'Bahubali' will break records in Marathi too! | मराठीतील बिग बजेट चित्रपट ‘बाहुबली’चेही रेकॉर्ड मोडणार!

मराठीतील बिग बजेट चित्रपट ‘बाहुबली’चेही रेकॉर्ड मोडणार!

googlenewsNext

‘देऊळबंद’ या चित्रपटासाठी कोठेही तडजोड केली नाही. सहा राज्यांमध्ये कथा घडत असल्याने, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन चित्रण केले आहे. त्याचबरोबर गाणी असो की अ‍ॅक्शन आणि स्टंट, हे हिंदीच्या तुलनेत कोठेही कमी पडणार नाहीत, हे पाहिले आहे, असे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून हा चित्रपट महाराष्ट्रात तरी बाहुबलीचेही रेकॉर्ड मोडेल. याचे कारण म्हणजे लोक तिकिटांचे बुकिंग करत नाहीत, तर संपूर्ण शोच बुक करू लागले आहेत, असे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले.
स्वामी समर्थांंच्या बॅकड्रॉपवर नास्तिकतेपासून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास उलगडत जाणाऱ्या या चित्रपटातील स्वामी समर्थांची भूमिका साकारण्याविषयी मोहन जोशी म्हणाले, ‘‘स्वामींना कोणी पाहिले नाही; पण त्यांची जी छायाचित्रे उपलब्ध आहेत, त्यावरून मेकअप केला. यासाठी जवळपास सहा महिने काम करत होतो. मेकअपमन महेश बाराटे यांंनी अक्कलकोट स्वामींचा इतका अप्रतिम मेकअप करून दिला होता, की जेव्हा मी मेकअप रूममधून बाहेर आलो, तेव्हा संपूर्ण टीम माझ्याकडे थक्क होऊन पाहत होती. इतकेच नव्हे तर शूृटिंग सुरू असलेल्या गावातील लोक अक्कलकोट स्वामी प्रकट झाल्याचे समजून माझ्यासमोर लोटांगण घालत होते. गिरिजा जोशी यांनी या चित्रपटात शास्त्रज्ञाच्या बायकोची भूमिका साकारली आहे. टोकाची मते नसणारी आणि मध्यममार्गी असणारी ही भूमिका असल्याचे ती म्हणाली.

श्रद्धेची नवी परिभाषा मांडणारा ‘देऊळबंद’

एखादा भलेही माझी पूजा करत नसेल, मला मानत नसेल, पण जो नियम पाळतो, कायदा पाळतो त्याच्या पाठीशी मी उभा आहे, असे प्रत्यक्ष स्वामी समर्थच सांगतात. सिग्नलवर देश ओळखला जातो, असा सामाजिक संदेश देणाऱ्या ‘देऊळबंद’ या मराठीतील पहिल्या सायन्स फिक्शन थ्रिलरबाबत सध्या उत्सुकता आहे.
देऊळबंद चित्रपटात स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, लेखक - दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी, निर्माते कैलास वाणी, अभिनेता गश्मीर महाजनी, अभिनेत्री गिरिजा जोशी, रमेश परदेशी, हृषीकेश देशपांडे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत देऊळबंद चित्रपटाविषयी गप्पा मारल्या. संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले.
स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून हा चित्रपट बनला
असला, तरी तो धार्मिक चित्रपट नाही. तर एका शास्त्रज्ञाचा नास्तिकतेपासून ते आस्तिकतेपर्यंतचा प्रवास त्यामध्ये उलगडला आहे. शूटिंगसाठी गावकऱ्यांनी केली घाटाची स्वच्छता या चित्रपटातील एका प्रसंगात कृष्णा नदीकाठचा घाट चित्रित करायचा होता. आंध्र प्रदेशातील हे ठिकाण होते. रात्री साडेअकरा वाजता युनिट तेथे पोहोचले, तेव्हा या घाटावर प्रचंड अस्वच्छता असल्याचे दिसून आले. शूटिंग तर पहाटे साडेचारला सुरू करायचे होते. संपूर्ण युनिटने काम केले असते, तरी किमान तीन दिवस लागले असते. या वेळी दिग्दर्शक प्रवीण तरडे कामाला लागले. रात्री ते गावात पोहोचले. गावकऱ्यांना सर्व परिस्थिती सांगितली. स्वामी समर्थांच्या भक्तीतून शंभराहून अधिक गावकरी घाटावर पोहोचले. पहाटेपर्यंत संपूर्ण घाट स्वच्छ करण्यात आलेला होता.’’

Web Title: Big Bets Movie 'Bahubali' will break records in Marathi too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.