'बिग बॉस ठरला करियरचा टर्निंग पॉईंट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 03:08 AM2017-01-21T03:08:17+5:302017-01-21T03:08:17+5:30

क्यो होता है प्यार या मालिकेद्वारे अमित सध याने त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली.

'Big Boss decides to turn career' | 'बिग बॉस ठरला करियरचा टर्निंग पॉईंट'

'बिग बॉस ठरला करियरचा टर्निंग पॉईंट'

googlenewsNext

- प्राजक्ता चिटणीस
क्यो होता है प्यार या मालिकेद्वारे अमित सध याने त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर तो चित्रपटांकडे वळला. काय पो छे, सुलतान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
तू छोट्या पडद्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली आहेस. तुझा हा अभिनयप्रवास कसा सुरू झाला? अभिनयक्षेत्रात यायचे असे मी लहानपणीच ठरवले होते. त्यामुळे मी शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाकडे वळलो. मी कधीच कॉलेजला गेलो नाही. मी अनेक ठिकाणी आॅडिशन देत होतो. त्यातूनच क्यो होता है प्यार या मालिकेसाठी माझी निवड झाली. माझी पहिलीच मालिका प्रेक्षकांना आवडली आणि मला अनेक आॅफर्स मिळायला लागल्या. बिग बॉसच्या पहिल्याच सिझनमध्ये मी होतो. या कार्यक्रमामुळे तर मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
तू छोट्या पडद्यावर काम केले आहेस, आजच्या मालिकांविषयी आणि छोट्या पडद्याविषयी तुला काय वाटते?
मला माझ्या व्यग्र शेड्युलमुळे छोट्या पडद्यावरचे कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत. आजचा छोटा पडदा हा खूप बदलला आहे. ते एक मोठे मीडियम बनले आहे. मला आज जे काही यश मिळाले आहे, ते माझ्या मालिकांमुळेच मिळाले आहे. त्यामुळे छोटा पडदा हा माझ्यासाठी नेहमीच स्पेशल आहे. भविष्यात एखादी चांगली भूमिका आॅफर झाली तर मला नक्कीच पुन्हा छोट्या पडद्यावर काम करायला आवडेल.
‘सुलतान’, ‘काय पो छे’ यांसारख्या चित्रपटांत तू खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेस, तू इतक्या वर्षांनंतर तुझ्या भूमिका अतिशय चोखंदळपणे निवडत आहेस का? मी माझ्या करिअरच्याबाबतीत कधीच प्लॅनिंग केलेले नाही. एखाद्या भूमिकेची आॅफर आल्यानंतर ती मला कितपत आवडते यावरच तो चित्रपट करायचा की नाही हे मी ठरवतो. मी अभिनयाला वेळ देण्यासोबतच माझ्या इतर छंदानांही तितकाच वेळ देतो. मी ट्रेकिंग करतो, लाँग ड्राईव्हवर जातो, माझे आयुष्य मी आनंदाने जगतो.

Web Title: 'Big Boss decides to turn career'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.