बिग बॉस मराठी २ - सुरेखा पुणेकर बाहेर, त्यानंतर घडले असे काही वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 10:07 AM2019-07-08T10:07:24+5:302019-07-08T10:10:34+5:30
महेश मांजरेकरांनी एकच फाईट वातावरण टाईट या कार्यामधून सगळ्या सदस्यांना त्यांच्या मनातील राग काढण्याची वा त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगण्याची संधी दिली.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये अतिथी देवो भव: हा टास्क रंगला आणि ज्यामध्ये बिग बॉस मराठी सिझन १ मधील सदस्य घरामध्ये गेस्ट बनून आले. या टास्कमध्ये नेहाच्या टीमने म्हणजेच टीम B ने बाजी मारली. बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये सुरेखा पुणेकर घराबाहेर पडल्या. या आठवड्यामध्ये हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली म्हाडे, किशोरी शहाणे आणि सुरेखा पुणेकर हे नॉमिनेशनमध्ये होते. ज्यामध्ये वैशाली म्हाडे आणि सुरेखा पुणेकर हे डेंजर झोनमध्ये गेले. महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये सुरेखा पुणेकर यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
संपूर्ण महाराष्ट्राचे मन यांनी त्यांच्या नृत्याने जिंकले आणि घरामध्ये आल्यानंतर त्यांनी सुरेखा पुणेकर बनून घरातील सदस्यांची, प्रेक्षकांची मने जिंकली. शिवने त्यांना आईचा दर्जा दिला. घरातील सदस्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी नेहेमीच आदर होता आणि राहील... सुरेखाताई घरातून बाहेर पडल्यावर सगळेच सदस्य भावूक झाले. सगळ्या सदस्यांनी सुरेखाताईना मानाचा मुजरा केला आणि “ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे” असे म्हंटले.
सुरेखा पुणेकरांना त्यांच्या आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली. महेश मांजरेकर यांनी सुरेखाताईना एक विशेष अधिकार दिला ज्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला अनसेफ करायचे होते पण त्यांनी असे करण्यास साफ नकार दिला.महेश मांजरेकरांनी एकच फाईट वातावरण टाईट या कार्यामधून सगळ्या सदस्यांना त्यांच्या मनातील राग काढण्याची वा त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगण्याची संधी दिली. या कार्यामध्ये किशोरी शहाणे आणि नेहाबद्दल सदस्यांना वाटणाऱ्या गोष्टी, राग इतर सदस्यांनी व्यक्त केला. माधवने वीणा आणि नेहा, शिवने नेहा आणि हिना, वैशालीने किशोरी शहाणे आणि नेहा यांना त्यांच्याविषयी वाटणाऱ्या गोष्टी व्यक्त केल्या.
रुपाली आणि वीणाने किशोरीताईचे नाव घेतले आणि त्यामुळे सगळ्याच सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तर किशोरी शहाणे यांना देखील खूप वाईट वाटले. तर अभिजीत केळकरने नेहा, किशोरी शहाणे यांना त्यांच्याविषयी वाटणाऱ्या गोष्टी सांगितल्या. वूट आरोपी कोण यामध्ये पारस पाटील याने नेहा शितोळेला आरोपी ठरवले. कॅप्टनसी टास्क मध्ये सुरेखाताई आणि टीम बरोबर चुकीची वागलीस त्यामुळे तिला सुरेखा यांची पाया पडून माफी मागण्यास सांगितले.