बिग बींचं पहिलं प्रेम होतं 'मराठी'

By Admin | Published: October 12, 2016 07:40 PM2016-10-12T19:40:10+5:302016-10-12T19:50:14+5:30

बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन अर्थात बिग बी नेहमीच मीडियाच्या चर्चेत असतात.

Big love was first 'Marathi' | बिग बींचं पहिलं प्रेम होतं 'मराठी'

बिग बींचं पहिलं प्रेम होतं 'मराठी'

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन अर्थात बिग बी नेहमीच मीडियाच्या चर्चेत असतात. अमिताभ यांच्या आयुष्यात अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांचे सर्वात पहिले प्रेम हे एका मराठी मुलीशी झाले होते. जंजिर, दिवार, अमर अकबर अ‍ॅन्थॉनी, अग्निपथ अशा एकाहून एक हिट चित्रपटांतून भूमिका साकारणारे अमिताभ ख-या आयुष्यात पहिल्यांदा एका मराठी मुलीच्या प्रेमात पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोलकात्यातील ब्लॅकर अँड कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असताना अमिताभ बच्चन चंदा नावाच्या मराठी मुलीच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी अमिताभ यांना 1500 तर, चंदा यांना 400 रुपये प्रतिमहिना पगार मिळत होता. अमिताभ बच्चन त्या मराठी मुलीशी लग्न करण्याच्याही विचारात होते. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये फाटलं आणि अमिताभ बच्चन नोकरी आणि कोलकाता सोडून मुंबईत स्थायिक झाले. त्यावेळी त्यांचा 26 दिवसांचा पगार कापण्यात आला होता, अशी माहिती त्याच्यासोबत ब्लॅकर अँड कंपनीत काम करणारे त्यांचे मित्र दिनेश कुमार यांनी दिली आहे.

चंदाचा नकार हाच अमिताभ बच्चन यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक प्रसंग ठरला असावा, असे मत अनेकांनी मांडले आहे. कोलकात्यात ज्या कंपनीत काम करत होते तेथे राजीनामा दिल्यामुळे तेथील पदाधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. एक नकार पचवत अमिताभ ते महानायक बिग बी बनण्यापर्यंतचा अमिताभ यांचा प्रवास फार रंजक आणि इतरांना प्रोत्साहित करणारा आहे, हे सर्वश्रुत आहे.

Web Title: Big love was first 'Marathi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.