नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; पत्नीच्या तक्रारीवरून फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:37 PM2023-08-04T17:37:11+5:302023-08-04T17:41:03+5:30
नितीन देसाई यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीने मानसिक त्रास दिला होता.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. एन. डी. फिल्म स्टुडीओचे मालक देसाई यांनी २ ऑगस्टला स्टुडिओतच आत्महत्या केली होती. ते कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्रस्त होते. यावर देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी खालापुर पोलीस ठाण्यात एका फायनान्स कंपनीविरोधात तक्रार दिली आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाई यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. या कर्जाच्या वसुलीसाठी ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी यांनी सारखा तगादा लावला होता. तसेच मानसिक त्रास दिला होता. त्या मानसिक त्रासाला कंटाळून देसाई यांनी आत्महत्या केली आहे, अशी तक्रार नेहा देसाई यांनी दिली होती.
या तक्रारीवरून खालापुर पोलीस ठाण्यात भादवि ३०६, ३४ अन्वये वरील ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी व इतर असे एकुण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर विभाग हे करीत आहेत.