Bigg Boss 13 : दुस-याच दिवशी या सीन्सला लागली कात्री; काय ‘बेड शेअरिंग’चा कन्सेप्ट पडला भारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:21 PM2019-10-02T16:21:52+5:302019-10-02T16:22:34+5:30
Bigg Boss 13 : टीव्ही वरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. होय, या सीझनमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे, ‘बेड फ्रेंड्स फॉरेव्हर’चा कन्सेप्ट.
ठळक मुद्देतूर्तास रश्मी देसाई व सिद्धार्थ शुक्ला बेड शेअर करत आहेत. बेड शेअरिंगनंतर पहिल्या तीनच दिवसांत रश्मी व सिद्धार्थमधील जवळीक वाढू लागल्याचे दिसतेय.
टीव्ही वरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. होय, या सीझनमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे, ‘बेड फ्रेंड्स फॉरेव्हर’चा कन्सेप्ट. या कन्सेप्टमुळे बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच स्पर्धकांचे बेड पार्टनर ठरवण्यात आले होते. विशेष म्हणजे, यावेळी मुलींना मुलांसोबत बेड शेअर करायचे होते. पण कदाचित हा नवा कन्सेप्ट ‘बिग बॉस 13’वर भारी पडताना दिसतोय. होय, 1 ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या शोच्या एपिसोडमध्ये जे काही दिसले त्यावरून तरी हेच दिसतेय.
‘बिग बॉस’चे सर्व स्पर्धकांची सकाळ गाण्याने होते. शोच्या सुरुवातीला सर्वजण झोपलेले दिसतात. यानंतर गाणे वाजताच सर्व स्पर्धक उठतात आणि डान्स करतात. पण 1 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये असे काहीही दिसले नाही. गाण्याऐवजी किचनमधून या एपिसोडची सुरुवात झाली. सर्व कटेस्टंट डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट करताना दिसले. ‘बिग बॉस’ने इतक्या वर्षांची परंपरा का तोडली? गाण्याने शोची सुरुवात का झाली नाही? असा प्रश्न त्यामुळे अनेकांना पडला.
खरे तर मुलींना मुलांसोबत बेड शेअर करावा लागणार याची घोषणा होताच, यंदाच्या सीझनवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोशल मीडियावरही याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. बेड शेअरिंग आणि अमीषा पटेलने दिलेला पहिला टास्क यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता.
तूर्तास रश्मी देसाई व सिद्धार्थ शुक्ला बेड शेअर करत आहेत. बेड शेअरिंगनंतर पहिल्या तीनच दिवसांत रश्मी व सिद्धार्थमधील जवळीक वाढू लागल्याचे दिसतेय. आता या बेड शेअरिंगने ‘बिग बॉस’च्या घरात आणखी काय काय नव्या गोष्टी घडतात ते बघूच.