सलमान खानच्या घरापर्यंत पोहोचली ‘Bigg Boss 13’च्या वादाची धग, 22 जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:36 AM2019-10-13T11:36:59+5:302019-10-13T11:37:20+5:30
bigg boss 13: टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस 13’चा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा शो बंद करण्याची मागणी होत असताना आता या वादाची धग ‘बिग बॉस 13’चा होस्ट सलमान खान याच्या घरापर्यंत पोहोचली आहे.
टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस 13’चा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा शो बंद करण्याची मागणी होत असताना आता या वादाची धग ‘बिग बॉस 13’चा होस्ट सलमान खान याच्या घरापर्यंत पोहोचली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच काही लोकांनी सलमानच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शने केलीत. निदर्शने करणा-या 22 लोकांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सलमान खान ‘बिग बॉस 13’चा होस्ट आहे. ‘बिग बॉस 13’ सुरु होऊन काही आठवडे होत नाही बोल्ड कंटेन्टमुळे हा शो बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. करणी सेनेनेही हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. पद्मावत, मणिकर्णिका आणि आर्टिकल 15 या सिनेमानंतर ‘बिग बॉस 13’ हा रिअॅलिटी शो करणी सेनेच्या रडारवर आला आहे. या शोमधील कंटेन्ट प्रचंड बोल्ड असून हा शो भारतीय संस्कृतीची पायमल्ली करणारा असल्याचे करणी सेनेने म्हटले आहे.
Sultani Akhade mein @shefali_bagga aur #MahiraSharma karengi dangal to win the Power Card!
— Bigg Boss (@BiggBoss) October 12, 2019
Watch #WeekendKaVaar with @BeingSalmanKhan tonight at 9 PM.
Anytime on @justvoot@Vivo_India#BiggBoss13#BiggBoss#BB13#SalmanKhanpic.twitter.com/29qQjgztVv
करणी सेनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहित हा शो बंद करण्याची मागणी केली होती. ‘बिग बॉस 13 मध्ये काश्मीरी मुलाबरोबर हिंदू मुलगी बेड शेअर करीत आहे. हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात आहे. हिंदू मुली लग्नाच्या आधी आई बनू शकतात, असा निष्कर्ष यातून निघतो. सरकारने या मुद्यावर तातडीने निर्णय घेत, हा शो त्वरित बंद करावा, ’असे करणी सेनेने या पत्रात म्हटले होते. भाजपा खासदार नंदकिशोर गुर्जर यांनीही प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘बिग बॉस 13’ हा शो बंद करण्याची मागणी पुढे रेटली होती.
#BiggBoss ke ghar ki queen banana nahi hai aasan, bohot saari planning aur strategy se hi hoga inka kaam!
— Bigg Boss (@BiggBoss) October 8, 2019
Dekhna hai kaun dega kiss ka saath, toh tune-in to #BiggBoss13, tonight at 10.30 PM!
Anytime on @justvoot@Vivo_India@BeingSalmanKhan#BB13#SalmanKhanpic.twitter.com/JvymbNOsJS
यामुळे विरोध
बिग बॉस 13 मध्ये बेड फ्रेन्ड्स फॉरएव्हर या थीममुळे वाद सुरु झाला. या बिग बॉसच्या घरातील महिला स्पर्धकाना पुरूषांसोबत बेड शेअर करणे बंधनकारक होते. याला लोकांनी जोरदार विरोध केला. विरोध वाढताना पाहून बिग बॉसने हा नियम बदलवला. आता कुठलाही स्पर्धक कुणासोबतही बेड शेअर करू शकतो. यानंतर ‘माऊथ टू माऊथ’ म्हणजे हातांचा वापर न करताना केवळ तोंडाने सामग्री पास करण्याचा या शोमधील एक टास्कही वादाच्या भोवºयात सापडला होता. फेस टू फेस नॉमिनेशनलाही लोकांनी विरोधकेलाआहे.