Bigg Boss 15: चोरी चोरी-छुपके छुपके...! अर्ध्या रात्री रश्मी व उमरचा रोमान्स, इतक्यात राखी आली आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:37 PM2021-12-21T12:37:26+5:302021-12-21T12:38:10+5:30
Bigg Boss 15 Rashmi Desai and Umar Riaz Relationship: ‘बिग बॉस 15’ अंतिम टप्प्यात आहे आणि बिग बॉसच्या घरात एक नवी लव्हस्टोरी फुलताना दिसतेय. होय, रश्मी देसाई व उमर रियाज यांच्या लव्हस्टोरीची सध्या जोरदार चर्चा आहे.
Bigg Boss 15: ‘बिग बॉस 15’ अंतिम टप्प्यात आहे आणि अशात बिग बॉसच्या घरात एक नवी लव्हस्टोरी फुलताना दिसतेय. होय, रश्मी देसाई (Rashami Desai) व उमर रियाज (Umar Riaz) यांच्या लव्हस्टोरीची सध्या जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मीने उमरवरचं प्रेम व्यक्त केलं होतं. आता दोघांच्या रोमान्सनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
कालच्या एपिसोडमध्ये उमर व रश्मी काऊचवर ‘चोरी चोरी-छुपके छुपके’ रोमान्स करताना दिसले. अर्ध्या रात्री गप्पा मारत असताना अचानक रश्मीने उमरला घट्ट मिठी मारली. अर्थात राखी सावंत दोघांची ‘चोरी’ पकडलीच. मग काय, राखी दोघांनाही डिवचण्याची संधी कशी सोडणार?
उमर व रश्मीचा अर्ध्या रात्री रोमान्स सुरू असलेला पाहून राखी बोलली. ‘लव्हलपाटा 2 हो रहा है यहां?’, असा सवाल तिनं केला. यावर, मौसम ही ऐसा आहे. जब आपको सर्दी लगती है तो आपको वॉर्म फिलिंग की जरूरत होती है. जब मैं गर्म हो जाऊंगा तो मैं रश्मी को कहूंगा चल हट, असं उमर म्हणतो. यावर रश्मी उमरला लाडाने एक पंच मारते. पण राखी यावरून दोघांना आणखी चिडवते. रश्मी रेशम का कंबल है, असं म्हणत ती दोघांची मजा घेते आणि सर्वजण हसायला लागतात.
यानंतर राखी थेट देवोलिनाकडे जाते आणि हे दोघे घरात येण्यापूर्वी रिलेशनमध्ये होते का? असा प्रश्न करते. मला माहित नाही, कदाचित ती मस्करी करत असेल, असं देवोलिना म्हणते. यावर ही मस्करी असेल तर मलाही अशी मस्करी करायची आहे. हे दोघे फक्त दिखावा करत आहेत. त्यांच्यात काहीही सीरिअस नाही, माझे हे शब्द लिहून ठेव, असं राखी म्हणते.