'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅन ठरला लोकमत डिजिटल म्युझिकल सेन्सेशन अवॉर्डचा मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 07:53 PM2023-02-22T19:53:43+5:302023-02-22T20:17:09+5:30
रॅपर एमसी स्टॅन(MC Stan)ला म्युझिकल सेन्सेशन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. एमसी स्टॅनचे इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.
मुंबईत मोठ्या दिमाखात लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला. रॅपर एमसी स्टॅन(MC Stan)ला म्युझिकल सेन्सेशन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. एमसी स्टॅनचे इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. त्याला इन्स्टावर 9 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. एमसी स्टॅनने नुकतीच बिग बॉस १६ ट्रॉफी आपल्या नावावर केली. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टॅन चांगलाच चर्चेत आहे.
२३ वर्षाचा एमसी स्टॅन एक हिंदी रॅपर आहे. युट्युबवरचे त्याचे रॅप सॉन्ग प्रचंड लोकप्रिय आहेत. त्याची युनिक पर्सनॅलिटी बघून त्याला बिग बॉस हा शो ऑफर केला गेला आणि स्टॅनने या संधीचं सोनं केलं. एमसी स्टॅन पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ तडवी आहे. पुण्यात जन्मलेल्या एमसी स्टॅनचं कुटुंब एका चाळीत राहायचं. १२ व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. आज एमसी स्टॅन हिप-हॉप इंडस्ट्रीतील मोठा चेहरा आहे.
लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने बड्या बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. ऑरमॅक्सने पॉप्युलॅरिटी लिस्ट म्हणजे लोकप्रिय व्यक्तींची यादी जारी केली आहे. जानेवारी २०२३ च्या Most Popular Non-Fiction Personalities यादीमध्ये एमसी स्टॅनने भाईजान सलमान खान याला मागे टाकलं आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅन इन्स्टावर लाईव्ह केलं होतं त्याच्या या इन्स्टा लाईव्हनेही इतिहास रचला. अवघ्या १० मिनिटांत एमसी स्टॅनचे लाइव्ह व्ह्यू पाच लाखांवर पोहाेचले. तो लाइव्ह असताना ५ लाख ४१ हजार लोक त्याला पाहत होते. इतके जास्त व्ह्यूज असणारा एमसी स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. याबाबतीत एमसी स्टॅनने शाहरुख खानला मागे टाकलं. आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाईव्हवर २५५K व्ह्यूज आले आहेत.
एमसीने अनेक गाणी गायली पण ‘वाटा’ या गाण्यानं त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. यूट्यूबवर या गाण्याला जवळपास २१ मिलियन व्ह्यूज मिळाले.