Bigg Boss 17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, मनारा चोप्रा जिंकेल का प्रेक्षकांची मनं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 09:14 PM2023-10-15T21:14:44+5:302023-10-15T21:16:51+5:30

बहुचर्चित 'बिग बॉस १७' चं नवं पर्व अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बिग बॉस १७'मध्ये लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री मनारा चोप्रा हिच्या एन्ट्रीने. 

bigg boss 17 actress mannara chopra enter in the house video | Bigg Boss 17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, मनारा चोप्रा जिंकेल का प्रेक्षकांची मनं?

Bigg Boss 17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, मनारा चोप्रा जिंकेल का प्रेक्षकांची मनं?

बहुचर्चित 'बिग बॉस १७' चं नवं पर्व अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेल्या कित्येक दिवसापासून प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारी(१५ ऑक्टोबर) 'बिग बॉस १७'चा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. यंदाच्या बिग बॉसच्या पर्वाची थीम सिंगल विरुद्ध कपल अशी आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोण कोण सहभागी होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बिग बॉस १७ मध्ये लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री मनारा चोप्रा हिच्या एन्ट्रीने. 

'बिग बॉस'च्या घरात मनाराला पाहून चाहतेही थक्क झाले. मनारा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारी पहिली सदस्य ठरली. तिला बिग बॉसच्या तीन घरांपैकी तिच्या आवडत्या घरात राहण्याची संधीही देण्यात आली.  मनारा ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. तिने 'जिद' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बिग बॉसमध्ये मनारा कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्याबाबत काय खुलासे करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

मनारा चोप्राने बिग बॉसच्या घरात येताच व्हायरल व्हिडिओबाबत भाष्य केलं. मध्यंतरी तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका इव्हेंटदरम्यान तिला दिग्दर्शकाने किस केलं होतं. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. यावर मनाराने भाष्य केलं. मनाराने बिग बॉसमध्ये येताच सलमानला नाचण्यास भाग पाडलं. सलमान आणि मनाराने 'लाल दुप्पटा' गाण्यावर डान्स केला. 
 

Web Title: bigg boss 17 actress mannara chopra enter in the house video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.