Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंचा हिरेजडीत सूट पाहिलात का? किंमत जाणून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 07:37 PM2024-10-11T19:37:39+5:302024-10-11T19:38:43+5:30

नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंनी हिरेजडीत सूट घातल्याचं पाहायला मिळालं.

Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte Wear Diamond Suit Worth One And A Half Lakhs Video Viral | Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंचा हिरेजडीत सूट पाहिलात का? किंमत जाणून बसेल धक्का!

Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंचा हिरेजडीत सूट पाहिलात का? किंमत जाणून बसेल धक्का!

'बिग बॉस'च्या १८व्या पर्वामुळे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते खूप चर्चेत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच सदावर्तेंनी घरात त्यांचा दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने गुणरत्न सदावर्तेंनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या बोलण्याची पद्धत, 'बिग बॉस'ला न घाबरता खंबीरतेने लढण्याची त्यांची शैली चाहत्यांना फार भावतेय. सगळीकडे सध्या सदावर्ते यांची चर्चा पाहायला मिळतेय. 

नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंनी हिरेजडीत सूट घातल्याचं पाहायला मिळालं. सदावर्तेंनी घातलेला हिरेजडीत हा सूट दीड लाखांचा असल्याचं शहजाद शेखने इतर सदस्यांशी बोलताना सांगितलं. यानंतर सदस्यांमध्ये  सदावर्ते यांच्याबद्दल चर्चा पाहायला मिळाली. तर दुसरीकडे सदावर्ते हे तुरुंगात असलेल्या हेमा यांना सूटवर असलेल्या हिऱ्यांविषयी माहिती देताना व्हिडीओमध्ये दिसले. यावेळी बोलताना मी टॅक्स भरतो, असेही ते म्हणाले. 

 गुणरत्न सदावर्ते हे 'बिग बॉस'च्या घरात सक्रिय असल्याचं दिसत आहे. नॉमिनेशन टास्कमध्येही त्यांनी राडा केल्याचं पाहायला मिळालं. गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेताच त्यांच्या हटके स्टाइलने सलमान खानचीही बोलती बंद केली होती. गुणरत्न सदावर्ते हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, या आठवड्या ते  'बिग बॉस'च्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यांचे चाहते त्यांना वाचवतात की ते घराचा निरोप घेतात, हे लवकरच कळेल. 

Web Title: Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte Wear Diamond Suit Worth One And A Half Lakhs Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.