Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 09:36 AM2024-10-03T09:36:44+5:302024-10-03T09:37:03+5:30

Bigg Boss 18 Contestants: निया शर्मा, गुरुचरण सिंह यांच्यासोबत आणखी एक नाव कन्फर्म?

Bigg boss 18 Gurucharan singh from taarak mehta ka ooltah chashmah confirmed for salman khan show | Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत

Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत

सर्वांनाच उत्सुकता असणाऱ्या बिग बॉस १८ (Bigg Boss 18) ची घोषणा झाली आहे. भाईजान सलमान खानच यंदाच्याही सीजनचं होस्टिंग करणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी सीझनचा ग्रँड प्रीमिअर रंगणार आहे. यावेळी बिग बॉसमध्ये कोणते चेहरे सहभागी होणार याची उत्सुकता ताणली आहे. टीव्ही अभिनेत्री निया शर्माचं नाव तर कन्फर्म झालं आहे. दरम्यान आता 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील सोढी या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) देखील शो मध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.

५१ वर्षीय गुरुचरण सिंह एप्रिल महिन्यात चांगलाच चर्चेत होता. दिल्लीतील घरुन तो मुंबईसाठी निघाला पण विमानतळावर पोहोचलाच नाही. त्याने मुंबईची फ्लाईट पकडलीच नाही. तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिस त्याचा शोध घेत होते. २५ दिवसांनी तो स्वत:च घरी परतला होता. आर्थिक अडचणींमुळे आलेल्या नैराश्याने तो गायब झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, आता गुरुचरणला बिग बॉस १८ ची ऑफर मिळाली आहे. आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे तो लोकप्रिय झाला होता. त्यामुळे बिग बॉसमधून तो सर्वांचं कसं मनोरंजन करेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.


याशिवाय बिग बॉस १८ साठी आणखी एक नाव कन्फर्म झालं आहे. 'व्हायरल भाभी' नावाने प्रसिद्धीझोतात आलेली हेमा शर्मा बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार आहे. तिला रातोरात शोसाठी फायनल केल्याची चर्चा आहे. ती सलमान खानच्या 'दबंग ३' मध्ये दिसली होती. गेल्या वर्षी हेमा शर्माने सलमान खानच्या सुरक्षारक्षकांवर आरोप लावला होता. त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचा, मारपीट केल्याचा तिचा दावा होता. 

Web Title: Bigg boss 18 Gurucharan singh from taarak mehta ka ooltah chashmah confirmed for salman khan show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.