Bigg Boss 18: कडक सुरक्षा अन् चोख बंदोबस्त! लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीला सलमानची केराची टोपली, सुरू केलं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 02:32 PM2024-10-18T14:32:22+5:302024-10-18T14:32:44+5:30

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानलाही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या मिळत आहेत. त्यामुळे यंदाचा विकेंड का वार होणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, धमक्यांना न जुमानता सलमान बिग बॉसच्या शूटिंगसाठी सेटवर गेल्याची माहिती मिळत आहे. 

Bigg Boss 18 salman khan started shooting for weekend ka waar after lawrence bishnoi threat call | Bigg Boss 18: कडक सुरक्षा अन् चोख बंदोबस्त! लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीला सलमानची केराची टोपली, सुरू केलं शूटिंग

Bigg Boss 18: कडक सुरक्षा अन् चोख बंदोबस्त! लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीला सलमानची केराची टोपली, सुरू केलं शूटिंग

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस १८चा दुसरा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी(१२ ऑक्टोबर) बाबा सिद्दिकींची हत्या झाल्याने सलमान खानने शूटिंग रद्द केलं होतं. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानलाही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या मिळत आहेत. त्यामुळे यंदाचा विकेंड का वार होणार की नाही? सलमान शूटिंग करणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, धमक्यांना न जुमानता सलमान बिग बॉसच्या शूटिंगसाठी सेटवर गेल्याची माहिती मिळत आहे. 

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शूटिंगच्या ठिकाणीही सलमान कडक बंदोबस्तात गेल्याचं समजत आहे. बिग बॉसचे अपडेट्स देणाऱ्या बिग बॉस तक या ट्विटर अकाऊंटवर यासंबंधी ट्वीट करण्यात आलं आहे. यामध्ये सलमान बिग बॉसच्या सेटवर पोहोचल्याचं म्हटलं गेलं आहे. "वीकेंड का वार शूट लवकरच सुरू होतंय. सलमान खान सेटवर पोहोचला आहे. वीकेंड का वारसाठी तुमच्या अपेक्षा काय आहेत", असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान शूट करत असलेल्या बिग बॉसच्या सेटवर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. शूटिंग दरम्यान कोणालाही त्या परिसरात थांबता येणार नाही. त्याबरोबरच तब्बल ६० सिक्युरिटी गार्ड बिग बॉसच्या सेटवर असणार आहेत. दरम्यान, सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली आहे. यामध्ये बिश्नोई गँगकडून ५ कोटींची मागणीही करण्यात आली आहे. 

Web Title: Bigg Boss 18 salman khan started shooting for weekend ka waar after lawrence bishnoi threat call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.