Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 11:45 PM2024-10-06T23:45:51+5:302024-10-07T00:19:01+5:30

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

९०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

शिल्पाबरोबरच नायरा बॅनर्जी, चाहत पांडे, इशा सिंह या अभिनेत्रीही बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.

खतरों के खिलाडीचा विजेता करण वीर मेहरा त्याचं नशीब आजमवण्यासाठी बिग बॉसच्या घरात आला आहे.

अविनाश मिश्रा, रजत दलाल, चुम दरंग यांनीही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते बिग बॉस हिंदीचं घर गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सारा खान आणि आफ्रिन खान हे खान कपल यंदा बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

शेहजादा, पॉलिटिशयन तजिंदर बग्गा आणि श्रुतिका यांनीही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

विवियन, हेमा शर्मा, मुस्कान बामने आणि एलिस कौशिक यंदा बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.