बिग बॉस गाजवणारी सुशांत शेलार -आस्ताद काळेची जोडी पुन्हा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 08:48 PM2018-10-10T20:48:15+5:302018-10-10T20:55:09+5:30
‘MR & MRS लांडगे’ नाटकामध्ये सुशांत-आस्ताद ची जोडी वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.
अभिनेता सुशांत शेलार आणि आस्ताद काळे यांची घनिष्ठ मैत्री ‘बिग बॉस’ कार्यक्रमात सगळ्यांनीच बघितली. आपल्या बेधडक व स्पष्ट वक्तेपणामुळे ‘बिग बॉस’ कार्यक्रम गाजवल्यानंतर हे दोघेजण पुन्हा एकत्र येत आपला नवा अंदाज प्रेक्षकांना दाखवायला सज्ज झाले आहेत. रंगनील निर्मित ‘MR & MRS लांडगे’ या आगामी नव्या नाटकातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी १३ ऑक्टोबरला दुपारी ४.३० वा. या नाटकाचा शुभारंभ वाशीमधील विष्णुदास भावे सभागृहात होणार आहे.
आपल्या या नव्या नाट्यकृतीबद्दल बोलताना हे दोघे सांगतात की, ‘MR & MRS लांडगे’ या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. वयाचे भान विसरायला लावणारी ही बेभान कॉमेडी निखळ आनंदासोबतच आमच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट ही प्रेक्षकांना देईल असा विश्वास हे दोघेजण व्यक्त करतात.
सुशांत आणि आस्ताद यांसोबत या नाटकात राजेश भोसले, परी तेलंग, मधुरा देशपांडे, रमा रानडे, अमर कुलकर्णी, अलका परब यांच्या भूमिका आहेत. कल्पना विलास कोठारी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. लेखन सुरेश जयराम तर दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. या दोघांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.