Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरातील स्पेशल बॉन्ड; याला मैत्री म्हणायचे की आणखी काही?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 03:30 PM2019-06-30T15:30:00+5:302019-06-30T15:30:02+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगतापची मैत्री, त्यांचे एकमेकांवरचे रुसवे फुगवे, त्यांची भांडण, शिवने तिला मनविण्यासाठी केलेल्या यक्ता, बनवलेले ‘हार्टस’ हे सगळेच प्रेक्षकांमध्ये आणि घरच्या सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगतापची मैत्री, त्यांचे एकमेकांवरचे रुसवे फुगवे, त्यांची भांडण, शिवने तिला मनविण्यासाठी केलेल्या यक्ता, बनवलेले ‘हार्टस’ हे सगळेच प्रेक्षकांमध्ये आणि घरच्या सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. शिव आणि वीणा या दोघांत स्पेशल बॉन्डिंग आहे, हे सगळ्यांचा दिसतेय. पण हे बॉन्डिंग आता वेगळ्याच वळणावर जात असल्याचे दिसतेय. कालच्या एपिसोडमध्ये वीणा शिवचे डोके मांडीवर घेऊन त्याच्या केसाला मसाज करताना दिसली. यावरून बिग बॉसच्या घरात आणखी एक लव्हस्टोरी फुलतेय, असे मानले जात आहे.
शिवला हिनासोबत पाहिले की, वीणाचा जळफळाट होतो. तो तिच्यासोबत बोलला तरी वीणा रूसून बसते. नुकताच हीना आणि शिवने खुदा जाने आणि पेहेला पेहेला प्यार है या गाण्यावर रोमँटिक डान्स केला. हा डान्स बघण्यासाठी वीणा बाहेर आली आणि त्यामुळे वीणाचा गैरसमज होऊ नये म्हणून त्याने डान्स करण्यास नकार दिला. पण इकड हिना रूसून बसली. ‘ती स्पेशल आहे तर तिच्यासोबत डान्स कर मला नको सांगूस डान्स करायला. तूच मला सांगितलस डान्स करायला म्हणून मी केला’, असे हिना म्हणाली. यावर शिवने हिनाचीही माफी मागितली.
वीणाच्या गैरहजेरीत शिव आणि हीना करतायत लिविंग रूममध्ये रोमँटिक डान्स...
— Colors Marathi (@ColorsMarathi) June 29, 2019
पाहा #BiggBossMarathi2#WeekendChaDaav आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर @shivthakare_@GmKishori@maadhavdeochake@VeenaJagtap@bhosle_rupalipic.twitter.com/Hn6IAeWIjy
शिव आणि वीणा दोघेही घरामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये आहेत. पण तरी देखील त्यांच्यातील केमिस्ट्री दिवसेंदिवस खुलत चालली आहे. त्यामुळे खेळावर परिणाम होत असल्याचे या दोघांच्याही गटामधील सदस्यांच्या लक्षात आलेय. दोघांनाही ते आपापल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिव व वीणा मानायला तयार नाही. आता ही मैत्री की आणखी काही, हे लवकरच कळेल.
Shiv and @officialveenie plan to visit Lal Bagcha Raja after #BiggBossMarathi2!
— Shiv Thakre (@Shiv_Thakre_) June 29, 2019
This shows their friendship is real and not just for the show.#GanpatiBappaMorya#aaplamanus#MarathiBoy#BBMarathi2#BiggBossMarathi#SupportShiv#TeamShivThakre#ShiVeenapic.twitter.com/qFrwJIFOIk